शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षतेसाठी ओळखीच्यांनाच सलूनमध्ये दिला गेला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशान्वये परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर रविवारी जिल्ह्याच्या विविध भागातील सलून दुकाने सुरळीतपणे सुरु झाली होती़ नंदुरबार शहरातील विविध भागात सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेल्या दुकानांमध्ये दक्षता म्हणून केवळ ओळखीच्यांनाच प्रवेश देत केस कापून देण्यात येत होते़सूलन आणि ब्युटीपार्लरमध्ये केवळ केस कापणे, हेअर डाईंग, वॅक्सींग आणि थ्रेडींग इत्यादी सेवांना परवानगी देण्यात आली होती़ जिल्हाधिकारी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशांचे रविवारपासून पालन सुरु करण्यात आले़ प्रामुख्याने सर्वच व्यावसायिकांनी डिस्पोजन वस्तूंचा वापर केला होता़ बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखते यावे अशी व्यवस्था करण्यात आली होती़ नाभिक दुकानादार संघटनेने सलून दुकाने सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत रविवारी सकाळी दुकाने सुरु करण्यापूर्वी सॅनेटायझेशन करण्यावर भर दिला होता़ तब्बल तीन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने सुरु करताना व्यावसायिकांनी आधी स्वच्छतेला महत्त्व दिल्याचे जागोजागी दिसून आले होते़ कोरोना संसर्गजन्य असल्याने त्या संबधीच्या उपाययोजना काय, आणि कशा कराव्यात याबाबत नाभिक दुकानदार संघटनेकडून रात्री उशिरापर्यंत सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात येत होती़ ज्या व्यावसायिकांकडे अँड्रॉईड फोन नव्हता त्यांना प्रत्यक्ष फोन करुन उपाययोजना सांगण्यात आल्या़ यात प्रामुख्याने गरजेचे असलेले ग्लोव्हज अप्रॅन, सॅनेटायझर सकाळी कुठे मिळेल याबाबत माहिती देऊन व्यवस्था करण्यात आली़सर्व तयारी करुन ग्राहकांसाठी दुकाने सुरु करताना काही ठिकाणी माहिती फलकही लावण्यात आले होते़ ग्राहक बसण्यापूर्वी आणि केस कापल्यानंतरही सॅनेटायझेशन करण्यावर भर देण्यात येत होता़ यातून पाच वाजेपासून मोजक्याच ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देत नाभिक बांधवांचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत़नाभिक दुकानदार संघटनेचे नंदुरबार शहरात ३५० पेक्षा अधिक सभासद आहेत़ त्यांनी विविध सूचनांचे पालन करत आज व्यवसाय सुरु केले़ यात डिस्पोजल अ‍ॅप्रन, रुमाल आणि वस्तारा यांचा वापर केला गेला़दुकानांमध्ये गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत काहींनी ग्राहकांना फोन करुन येण्याबाबत सुचवले़४नाभिक बांधवांनी हातात ग्लोव्हज, तोंडावर मास्क, डोक्यावर कापड गुंडाळत दक्षता घेत केवळ कटींग करुन दिली़बऱ्याच ठिकाणी ग्राहकांकडून दाढी करण्याचा आग्रह करण्यात आला़ त्याला सूलन दुकानदारांनी नकार दिला होता़ तोंडावर मास्क न काढता अनेकांची कटींग उरकण्यात आली़ ग्राहकाचा यादरम्यान मास्क निघू नये म्हणून चिकटपट्टी लावली गेली होती़कोणत्याही प्रकारची दरवाढ शहर किंवा जिल्ह्यातील सलून दुकानात करण्यात आली नाही़