शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात ‘उज्‍जवला’ योजनेंतर्गत फक्त 800 कनेक्शन वाटप

By admin | Updated: May 21, 2017 17:15 IST

प्रधानमंत्री ‘गॅस’ योजना गैरसमजात अडकली

 नंदुरबार,दि.21- केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व सहा तालुक्यातून केवळ 20 हजार दारिद्रय़रेषेखाली महिलांनी अर्ज आहेत़ राज्यातील सर्वात कमी गॅस कनेक्शन असलेला दुस:या क्रमांकाचा जिल्हा अशी ओळख निर्माण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात उज्‍जवला योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चिंता वाढल्या आहेत़   

जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिकांची संख्या तब्बल दोन लाख 10 हजार असताना, सहा महिन्यात 20 हजार अर्ज आले आहेत़ उज्‍जवला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेतल्यास यादीतून नाव वगळले जाईल, असा समज दारिद्रय़ रेषेखालील महिलांमध्ये निर्माण झाला आह़े या गैरसमजामुळे गेल्या सहा महिन्यात कंपन्यांचे 10 हजार कनेक्शन वाटपाचे ‘टार्गेट’ असताना त्यांना केवळ 800 कनेक्शन वाटप करता आले आहेत़ 
2011 साली तयार करण्यात आलेल्या दारिद्रय़रेषेखालील नागरिकांच्या याद्यांमध्ये समाविष्ट अशा महिलांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ देण्यात येत आह़े या महिलांच्या याद्या केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या इंडियन ऑईल कंपनी, हिंदूस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या नंदुरबार जिल्ह्यातील डिलर्सना देण्यात आली आह़े या याद्यांनुसार गेल्या सहा महिन्यात 800 लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आह़े  
कनेक्शन वाटपासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इंडियन ऑईल कंपनीचे 11, हिंदूस्थान पेट्रोलियमचे तीन आणि भारत पेट्रोलियम कंपनीने नियुक्त केलेल्या एका गॅस वितरकावर जबाबदारी नेमण्यात आली आह़े त्यांच्याकडून गेल्या सहा महिन्यात विविध शिबिरे आणि जनजागृतीपर बैठकांद्वारे या योजनेची माहिती देण्यात येत आह़े केंद्रशासनाकडून 1 हजार 600 रूपयांचे भांडवल गॅस सिलींडर आणि शेगडी खरेदीला सर्वाधिक पसंती देण्यात आली आह़े यामुळे एक रूपयाही खर्च न करता दारिद्रय़रेषेखालील महिलांना हा गॅस मिळणार आह़े 
नंदुरबार जिल्ह्यात एकूण तीन लाख 30 हजार 147 शिधापत्रिकाधारक आहेत़ त्यावर 15 लाख 71 हजार 298 नागरिक आहेत़ यात दोन लाख 10 हजार 279 शिधापत्रिका ह्या  दारिद्रय़ रेषेखालील तर 83 हजार 253 केशरी व सात हजार 152 शिधापत्रिका ह्या शुभ्र आहेत़ जिल्ह्यात तीन केंद्रशासन पुरस्कृत गॅस कंपन्यांकडून तीन लाख शिधापत्रिकाधारकांपैकी केवळ 1 लाख 10 हजार गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आहेत़ हे सर्व गॅस कनेक्शन पांढ:या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात आले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील नागरिक हे गॅस कनेक्शन विनाच आहेत़ 
एकूण शिधापत्रिकांपैक दारिद्रय़ रेषेखालील दोन लाख नागरिक आजही गॅस कनेक्शनअभावी असल्याने उज्ज्वलाअंतर्गत त्यांना शेगडी आणि सिलींडर देण्यासाठी संबधित कंपन्या प्रयत्नशील आहेत़
संबधित कंपन्यांकडून दारिद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटूंबांच्या नावांची तपासणी करण्यात येऊन गॅस कनेक्शन नसलेल्या घरातील महिलेच्या नावाले अर्ज तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आह़े