अतिदुर्गम भागात आॅनलाईन अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:37 IST2020-05-13T12:37:05+5:302020-05-13T12:37:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतिदुर्गम भागातील वेली, ता.अक्कलकुवा येथील कै.दिलवरसिंग ...

Online teaching in remote areas | अतिदुर्गम भागात आॅनलाईन अध्यापन

अतिदुर्गम भागात आॅनलाईन अध्यापन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतिदुर्गम भागातील वेली, ता.अक्कलकुवा येथील कै.दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थेच्या वेली माता आश्रमशाळेतर्फे सोशल मिडियाचा वापर करीत आॅनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. हे लॉकडाऊन कधी थांबणार हे निश्चित नसल्याने वेली येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी दुसरी ते १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ज्यांच्या पालकांजवळ अँड्रॉईड मोबाईल आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गातील विषय शिक्षकांनी २५ एप्रिलपासून अभ्यास घेणे सुरू केले आहे. अतिदुर्गम भाग असल्याने इंटरनेटची अडचणीसह इतर बाबींवर मात करीत शिक्षकांनी आॅनलाईन अध्यापन सुरू केले असून विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिलेल्या अभ्यासाची पडताळणीही शिक्षकांकडून करण्यात येते. आश्रमशाळेने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियाही सुरू केली आहे. आठवड्यातून दोनवेळा संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षक आॅनलाईन एकत्र येऊन उपक्रमाबाबत चर्चा करण्यात येते.

Web Title: Online teaching in remote areas