शिक्षकांची ऑनलाइन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:39+5:302021-02-22T04:20:39+5:30

जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य डॉ. जे.ओ. भटकर यांनी ...

Online meeting of teachers | शिक्षकांची ऑनलाइन बैठक

शिक्षकांची ऑनलाइन बैठक

जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य डॉ. जे.ओ. भटकर यांनी आयोजित केली होती. यावेळी जिल्हा शिक्षण व या प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील जेष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहायक व जिल्ह्यातील १०० शिक्षक यावेळी होते. कोविड १९ काळात शिक्षकांना ऑनलाइन – ऑफलाइन माध्यमातून काम करत असताना आलेले अनुभव, अडचणी आणि सद्य:स्थिती समजून घेणे, पुढील शैक्षणिक नियोजन करताना कमी कालावधीत अपेक्षित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी काय करता येईल, यासंबंधीचे विचार शिक्षकांकडून समजून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड काळात आपण मुलांपर्यंत शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून कसे पोहोचलो आहोत? या काळात मूल नेमके काय शिकले आहे? यासारखे प्रश्न विचारून शिक्षकांना बोलते करण्यात आले. या काळात विद्यार्थी जीवन शिक्षण जास्त शिकले, मूल स्वतःच शिकण्यात सक्षम झाले, शिक्षकांनाही या काळात तंत्रस्नेही व्हावे लागले, या काळात शिक्षक मित्र आणि विषय मित्र यांची खूप मदत झाली, ऑनलाइन सोबतच ऑफलाइन शिक्षणाचे विविध पर्याय मिळाले. पुढील काळात शाळेत विद्यार्थी उपस्थिती १०० टक्के राहण्यासाठी सद्य:स्थितीला पालकांचे, विद्यार्थ्यांचे सर्वच पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. यासारख्या काही प्रतिक्रिया शिक्षकांनी यावेळी दिल्या. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन शिक्षकांनी सक्रियपणे चर्चेत सहभाग घेतला. शाळांवर नेमके विद्यार्थांना कसे अध्यापन करावे, याची दिशा मिळाली.

Web Title: Online meeting of teachers