शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात हलक्या प्रतीच्या कांद्यालाही चार हजाराचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजारात कांदा दरवाढ कायम असून हलक्या प्रतीचा ओला कांदाही चार हजार रुपये प्रतिक्विंटल दरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजारात कांदा दरवाढ कायम असून हलक्या प्रतीचा ओला कांदाही चार हजार रुपये प्रतिक्विंटल दरात व्यापारी खरेदी करुन साठा करत असल्याचे चित्र मार्केट यार्डमध्ये दिसून आल़े गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांदा आवक घटली होती़  दोन दिवसांपासून चांगल्या प्रतीच्या कांद्याला साडे सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतक:यांनी नंदुरबार बाजाराची वाट धरली होती़ सोमवारी बाजारात तब्बल 800 कट्टे कांदा आवक झाली होती़ हा कांदा चांगल्या प्रतीचा असल्याने त्याला साडेसहा हजारार्पयत दर देण्यात आले होत़े मंगळवारीही ही स्थिती कायम राहिल अशी अपेक्षा होती़ परंतू आठवडे बाजाराच्या दिवशीच लगतच्या तालुक्यातून हलक्या प्रतीचा ओला कांदा येथे विक्रीसाठी आणला गेला़ या कांद्यालाही 3 हजार 500 ते 4 हजार असा भाव व्यापा:यांकडून देण्यात येऊन खरेदी करण्यात आली़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात उत्पादित होणा:या कांद्याला इंदौरच्या बाजारात सोमवारी साडेसहा हजार रुपयांच्या पुढे दर मिळाल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा वाहने मध्यप्रदेशाकडे वळली़ यामुळे येथील बाजार समितीत दिवसभरात 400 कट्टे कांदा आवक होऊ शकली़ नंदुरबार बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासाठी मोठे व्यापारी नसल्याने शेतक:यांचा जास्तीत जास्त माल खरेदी केला जावू शकत नाही़ परिणामी मोठे शेतकरी कांदा घेऊन परराज्य गाठत आहेत़ परवानाधारक व्यापा:याची नियुक्ती करण्यासाठी बाजार समिती प्रशासन गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करुनही त्यांना यश आलेले नाही़ दरम्यान येत्या काळात नंदुरबारातील दोघे आडतदारांची येथे व्यापारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आह़े