बारी गावातून एक लाखाचे सागवान लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:07+5:302021-07-03T04:20:07+5:30

हे सागवानी लाकूड शासकीय वाहनातून जप्त करून नवापूर आगारात नेण्यात आले. या वेळी नवापूर वनविभागाच्या आगारात पंचनामा करून लाकडे ...

One lakh teak wood seized from Bari village | बारी गावातून एक लाखाचे सागवान लाकूड जप्त

बारी गावातून एक लाखाचे सागवान लाकूड जप्त

हे सागवानी लाकूड शासकीय वाहनातून जप्त करून नवापूर आगारात नेण्यात आले. या वेळी नवापूर वनविभागाच्या आगारात पंचनामा करून लाकडे जप्त करण्यात आली आहेत. नवापूर व चिंचपाडा वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई नवापूरचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, वनपाल डी.के. जाधव, बी.एस. दराडे, के.एम. बडुरे, वनरक्षक एस.बी. गायकवाड, डी.डी. पाटील, एन.आर. पाटील, एस.ए. खैरनार, एस.डी. बडगुजर, आर.के. पावरा, के.एन. वसावे, एल.एस. पवार, ए.जी. पावरा, ए.बी. पावरा, ए.आर. वळवी, वाहनचालक चमाऱ्या गावीत व वनमजूर अनिल गावीत यांनी केली.

दरम्यान, नवापूर शहरातून रात्री राजरोसपणे लाकडाची मोटारसायकलवर तस्करी सुरू आहे. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळत नाही. याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: One lakh teak wood seized from Bari village