शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा व शहादा तालुक्यात दोन वेगवेगगळ्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा व शहादा तालुक्यात दोन वेगवेगगळ्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. पहिली घटना धडगाव-तळोदा रस्त्यावर कोठारनजीक मजूर घेवून जाणारा टेम्पो उलटल्याने आठजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्यांमध्ये इरा सुडय़ा वसावे (55), दारज्या गुज:या वळवी (35), पिंटय़ा दारज्या वळवी (15), मेहंदी इरा वळवी (45), कविता जेरमा वसावे (18), सांगली दिवाल्या वळवी (21), कविता फेंदा वळवी (21), बुटी जुन्या पाडवी (36) सर्व रा.त्रिशुल, ता.तळोदा यांचा समावेश आहे. धडगावकडून तळोदाकडे येणारा मालवाहू मिनी टेम्पो भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अचानक उलटला. अंधारामुळे आणि मोबाईल रेंजच्या अभावी जखमींना लवकर मदत मिळू शकली नाही. अशोक जुन्या पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक वामन हु:या वसावे, रा.त्रिशुल याच्याविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वसावे करीत आहे.युवक ठारदुसरी घटना शहादा-धडगाव रस्त्यावर म्हसावदनजीक घडली. भरधाव मालवाहू टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना म्हसावद फाटय़ावर गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली.अमित लक्ष्मण पाडवी (26) रा.जमाना, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. शहादाकडून धडगावकडे जाणारा मिनी टेम्पोने म्हसावद फाटय़ाजवळ समोरून येणा:या दुचाकीला कट मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. त्यात अमित पाडवी हा युवक जागीच ठार झाला. तर गौरवकुमार मोतीराम वळवी (26) हा युवक जखमी झाला. टेम्पो चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहे.