भरधाव कार उलटल्याने देऊर येथील एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:30 PM2020-03-28T12:30:14+5:302020-03-28T12:30:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : भरधाव कार उलटल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना बह्याणे, ता.नंदुरबारनजीक शुक्रवारी सकाळी ...

One killed in Deor after overturning car | भरधाव कार उलटल्याने देऊर येथील एक ठार

भरधाव कार उलटल्याने देऊर येथील एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : भरधाव कार उलटल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना बह्याणे, ता.नंदुरबारनजीक शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. मयत व जखमी हे देऊर, ता.शहादा येथील आहेत.
जयपालसिंग लोटनसिंग गिरासे (२२) रा.देऊर, ता.शहादा असे मयताचे नाव आहे. तर संदीप कोमलसिंग गिरासे हा युवक जखमी झाला. पोलीस सूत्रांनुसार, जयपाल व संदीप हे खाजगी वाहनाने (क्रमांक जीजे ५ सीएफ १४५५) अंकलेश्वर येथून आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी लंघाणे, ता.शिंदखेडा येथे आले होते. त्यांना सोडून ते दोघे सकाळी ८ वाजता निमगुळमार्गे बह्याणे गाव ओलांडून मांजरे, ओसर्लीमार्गे नंदुरबारकडे जात होते.
ओसर्लीनजीक त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. त्यात जयपाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला संदीप गिरासे हा युवक जखमी झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
जयपाल हा सुरत येथे खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तेथेच त्याचा भाऊ देखील राहतो. तर विधवा आई देऊर येथे राहते. दोन्ही भाऊ अविवाहित आहेत.
शोकाकूल वातावरणात त्याच्यावर दुपारी देऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवाने सात वर्षांपूर्वी जयपाल यांच्या वडिलांचे देखील अपघातात निधन झाले होते. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One killed in Deor after overturning car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.