शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

ॲपेरिक्षा अपघातात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 12:34 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  विसरवाडी-नंदुरबार मार्गावर बोदवड गावाच्या शिवारात ॲपेरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक ...

 लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :  विसरवाडी-नंदुरबार मार्गावर बोदवड गावाच्या शिवारात ॲपेरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पोलीस सूत्रानुसार, विसरवाडी-नंदुरबार मार्गावर गुरुवारी साडेपाच वाजेच्या सुमारास हिरालाल गोरजी वळवी (३५) व शिवदास आकल्या गावीत (५४) (दोन्ही रा.भरडू, ता.नवापूर) हे डिझेल भरण्यासाठी ॲपेरिक्षा (क्रमांक जीजे ०७ वायवाय-२५०६) विसरवाडी येथे घेऊन येत होते. या वेळी बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात हिरालाल वळवी यांच्या अंगावर रिक्षा पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेल्या शिवदास गावीत हे किरकोळ       जखमी झाले. जखमी अवस्थेत      दोघांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी हिरालाल वळवी यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत आकल्या गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून मोटार अपघाताची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार अरुण कोकणी हे करीत आहेत.दरम्यान, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.