नंदुरबारात मद्याच्या नशेत पाण्याच्या टाकीवरून उडी घेतल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:35 PM2020-02-19T13:35:02+5:302020-02-19T13:35:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अमर चित्र मंदिराजवळील तलाठी कॉलनीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने मद्याच्या ...

 One dies after jumping from a drunk water tank in Nandurbar | नंदुरबारात मद्याच्या नशेत पाण्याच्या टाकीवरून उडी घेतल्याने एकाचा मृत्यू

नंदुरबारात मद्याच्या नशेत पाण्याच्या टाकीवरून उडी घेतल्याने एकाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अमर चित्र मंदिराजवळील तलाठी कॉलनीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने मद्याच्या नशेत उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, येथील खोडाईमाता परिसरातील झोपडपट्टीत राहणारा संतोष बाबू वडार (४२) याने मद्य प्राशन करून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अमर चित्र मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढला. काही काळ त्याने मनोरंजन केले. या वेळी बघ्यांची गर्दीही जमली होती. लोक त्याला खाली उतरण्याचे आवाहन करीत होते. अशा स्थितीतच त्याने अचानक पाण्याच्या टाकीवरुन उडी घेतली. याबाबतचे चित्रीकरण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये केले. संतोष वडार खाली पडताच तो रक्तबंबाळ झाला. त्याला लागलीच गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या वाहनाद्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत राजू वामन वडार याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  One dies after jumping from a drunk water tank in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.