शहादा महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:02+5:302021-05-15T04:29:02+5:30

कार्यशाळेचे उद्‌घाटन कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.पंकज नन्नावरे यांनी ...

One day workshop at Shahada College | शहादा महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

शहादा महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

कार्यशाळेचे उद्‌घाटन कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.पंकज नन्नावरे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील होते. त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी विकास अधिकारी व कार्यशाळेच्या संयोजिका डॉ.मृणाल जोगी यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ.एम.के पटेल, उपप्राचार्य डॉ.एस.डी. सिंदखेडकर, प्रा.डॉ.आय.जे. पाटील उपस्थित होते.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात प्रा.खुमानसिंग वळवी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी अर्ज सादर करते वेळी आवश्यक असलेली रिझुम, बायोडेटा व करिक्युलम व्हाईटा यांच्यातील फरक स्पष्ट केला व प्रभावी नोकरी अर्ज कसा लिहावा, याची माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना अर्ज लिहिण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रा.महेश जगताप, डॉ. मिलिंद पाटील प्रा.वजिह अशर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.एस. माळी यांनी तर आभार सहायक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.एम. गांगुर्डे यांनी मानले. तांत्रिक बाजू डॉ.मिलिंद पाटील यांनी सांभाळली. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांमधून चेतना चौधरी व उत्कर्षा निकम यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: One day workshop at Shahada College