दीड लाखाच्या ठिबक नळ्या आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:10 PM2020-02-18T12:10:57+5:302020-02-18T12:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात शेताच्या बांधावर ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांना ...

One and a half million ducts drip into the fire | दीड लाखाच्या ठिबक नळ्या आगीत खाक

दीड लाखाच्या ठिबक नळ्या आगीत खाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात शेताच्या बांधावर ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांना माथेफिरुने आग लावल्याची घटना १६ फेब्रुवारीच्या रात्री घडली. दरम्यान, शेती साहित्याचे नुकसान करणाऱ्या माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोड, ता.तळोदा येथील शेतकरी अंबालाल छगन नवले (मराठे) यांची बोरद शिवारात शेती आहे. सर्वे नंबर २५० मधील शेताच्या बांधावर त्यांनी ठिबक सिंचनसाठी लागणाºया नळ्या गोळा करून ठेवल्या होत्या. सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या पाच हजार मीटर नळ्यांचे बंडल शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याने गोळा करून ठेवले होते. १६ फेब्रुवारीच्या रात्री माथेफिरुने बांधावर ठेवलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांना आग लावली. या आगीत या नळ्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. याबाबत अंबालाल नवले यांनी बोरद पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली असून पोलीस पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बोरद पोलीस दूरक्षेत्राचे जमादार विजय ठाकरे व हवालदार एकनाथ ठाकरे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, बोरद व मोड परिसरात कापसासह इतर पिकांची चोरी, उसाला आग लावणे, सबमर्सिबल पंपची केबलसह शेतीसाहित्याची चोरी या घटना नित्याच्या झाल्या असून पोलिसांनी चोरटे व माथेफिरुंचा तपास लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title: One and a half million ducts drip into the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.