खेडदिगर येथील कापूस व्यापाऱ्याचे साडेचार लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:45 IST2020-01-29T12:45:47+5:302020-01-29T12:45:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : खेडदिगर ता़ शहादा येथील कापूस व्यापाºयाच्या ताब्यात साडेचार लाख रुपये लुटीची घटना शनिवारी रात्री ...

One and a half lakhs of cotton traders were robbed in Kheddigar | खेडदिगर येथील कापूस व्यापाऱ्याचे साडेचार लाख लुटले

खेडदिगर येथील कापूस व्यापाऱ्याचे साडेचार लाख लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : खेडदिगर ता़ शहादा येथील कापूस व्यापाºयाच्या ताब्यात साडेचार लाख रुपये लुटीची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या खेतिया येथे घडली होती़ याप्रकरणी खेतिया पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे़
संतोष गुलाबराव चित्ते हे शनिवारी मध्यप्रदेशातील खेतिया येथून कापूस खरेदीचा व्यवहार आटोपून खेडदिगर येथील घराकडे जात होते़ दरम्यान एकाने हात दिल्यानंतर त्यांनी मोटारसायकलची गती कमी केली होती़ ही संधी साधून दोघांनी त्यांच्या अंगावर धाव घेत त्यांच्या ताब्यात साडेचार लाख रुपये असलेली बॅग पळवून नेली़ यावेळी नजीकच्या हॉटेलमध्ये कामास असलेल्या रखवालदाराने मदतीस येऊन आरडाओरड केली होती़ दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा पाठलाग केला़ परंतू चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले़ संतोष चित्ते यांच्या फिर्यादीवरुन खेतिया पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे करत आहेत़

Web Title: One and a half lakhs of cotton traders were robbed in Kheddigar