शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा प्रकल्पातील १४ आश्रमशाळांमध्ये आॅफलाईन ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुर्गम व अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटी अभावी आॅनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुर्गम व अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटी अभावी आॅनलाईन लर्निंग व स्टडी फ्रॉम होम संकल्पनेला मुकावे लागले होते़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते़ वृत्ताची दखल घेत तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आॅफलाइन स्टडी फ्रॉम होम संकल्पना स्वीकारली असून १४ आश्रमशाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर संकल्पना राबवली जात आहे़लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत़ विद्यार्र्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळांनी स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना स्विकारली आहे़ तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांमध्येही स्टडी फ्रॉम होम अंतर्गत आॅनलाइन लर्निंग उपक्रम राबविण्यात येत होता. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी तळोदा प्रकल्पात येणाºया आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला नव्हता़ कनेक्टिव्हिटीसोबत पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याचीही अडचण समोर आली होती़ ‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन लर्निंगची समस्या मांडल्यानंतर तळोदा प्रकल्पाने आॅफलाइन स्टडी फ्रॉम होम हा उपक्रम हाती घेतला आहे़ यांतर्गत विद्यार्थ्यांना घरपोच गृहपाठ पोहचवून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जात आहे. १४ शासकीय आश्रमशाळांचे शिक्षक विषयनिहाय गृहपाठ तयार करत आहेत़ व्हाटसअ‍ॅपमार्फत शाळांना गृहपाठ पुस्तिका पुरवणे, विद्यार्र्थ्यांपर्यंत त्याचे वाटप करणे यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ गृहपाठ साहित्य पुरवणारी समितीत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,अधीक्षक, इयत्ता आठवी वगार्तील विद्यार्थ्यांचे पालक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किंवा सदस्य यांचा समावेश आहे.प्रकल्पातील शिर्वे, लोभाणी, सलसाडी, अमोनी, राणीपूर, बोरद, जांबाई, इच्छागव्हाण, नाला, कुंभारखान, अलीविहीर, तालंबा, मोरांबा या आश्रमशाळांमध्ये ही संकल्पना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ विषयनिहाय गृहपाठाची पीडीएफ प्रकल्प कार्यालयामार्फत व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून शाळांचे मुख्याध्यापक, गृहपाठ साहित्य पुरवणाºया समितीपर्यंत पोहोचवल्या जातील़ तेथून विषयनिहाय गृहपाठाच्या प्रती विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचते केले जाणार आहेत़