शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचा:यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्व विभाग प्रमुखांनी विधानसभा निवडणूक कालावधीत निवडणूक कामकाजाला विशेष प्राधान्य देऊन दिलेली जबाबदारी योग्यरितीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्व विभाग प्रमुखांनी विधानसभा निवडणूक कालावधीत निवडणूक कामकाजाला विशेष प्राधान्य देऊन दिलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी, त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे 24 तासाच्या आत सर्व राजकीय बॅनर काढण्यात यावे व विकासकामांच्या कोनशीला योग्यप्रकारे झाकण्यात याव्यात. घरावर असलेले विविध राजीकीय पक्षांचे ङोंडे काढण्यात यावे. एसटी बसेसवरील शासकीय जाहीराती आणि वाहनांवरील राजकीय पक्षांचे स्टिकर्स काढण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिका:यांचे वाहने जमा करण्यात यावेत. जिल्ह्याच्या सीमेवर आणि महत्वाच्या मार्गावर नाकाबंदी करून अवैध मद्याची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही विकासाचे काम नव्याने सुरू करता येणार नाही किंवा नव्या   कामांना मंजुरी देता येणार नाही. सर्व यंत्रणांनी कुठल्याही शासकीय योजनेची प्रसिद्धी करू नये. कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येईल  याची दक्षता सर्व विभागांनी   घ्यावी, असे त्यांनी सांगितले.  पंडीत म्हणाले, गुजरातमध्ये    जाणा:या अवैद्य दारूबाबत उत्पादन शुल्क विभागाने प्रमुख मार्गांवर लक्ष द्यावे व पोलीस विभागाच्या  सहकायार्ने अशा वाहतूकीला प्रतिबंध करावा. सर्व विभागांनी आचारसंहितेच्या पालनासाठी समन्वयाने कामे करावे. मागील निवडणुकीत आचारसंहिता भंगाबाबत गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तिंवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. जगदाळे यांनी आदर्श आचारसंहितेबाबत सादरीकरण केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आचारसंहिता व माध्यम कक्षाला भेट दिली.बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.