शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नर्सरी, केजीच्या हजारो चिमुरड्यांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

नंदुरबार : कोरोनाची भीती कायम आहे. पुढील टप्पा तर लहान मुलांवर सर्वाधिक प्रभावित करणारा ठरणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे ...

नंदुरबार : कोरोनाची भीती कायम आहे. पुढील टप्पा तर लहान मुलांवर सर्वाधिक प्रभावित करणारा ठरणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष कसे असेल याचा अद्यापही अंदाज येत नाही. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळेची पहिली पायरी ठरणाऱ्या नर्सरी व केजीच्या चिमुकल्यांचे पुढील वर्षही घरीच जाणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे.

प्राथमिक शाळेच्या पूर्वतयारीसाठी नर्सरी व केजीचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर खासगी संस्थांनी नर्सरी व केजीचे वर्ग सुरू केेले आहेत. विविध माध्यमातून पालकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न देखील असतो. हजारो रुपये शुल्क भरून पालक अशा ठिकाणी आपल्या चिमुकल्यांना पाठवत असतात. नर्सरी, केजीमधील बडबड गीतापासून सुरू झालेला या चिमुकल्यांच्या शाळेच्या प्रवासासाठी सर्वच पालक उत्सुक असतात. परंतु गेल्या वर्षापासून नर्सरी व केजीचे वर्गच भरू शकले नाहीत. ऑनलाइनचा तर प्रश्नच नाही. चिमुकल्यांना त्यातील काय कळणार. त्यामुळे येणारे शैक्षणिक वर्ष देखील या चिमुकल्यांना घरातत काढावे लागणार हे स्पष्टच आहे.