शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसोबत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या घटली; पाॅझिटिव्हिटी रेट घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : मार्च महिन्यात कोरोनाचा विस्फोट झालेल्या नंदुरबार जिल्ह्याचा मृत्युदर आणि पाॅझिटिव्हिटी रेट वाढला होता. पाॅझिटिव्हिटी रेट थेट ३० ...

नंदुरबार : मार्च महिन्यात कोरोनाचा विस्फोट झालेल्या नंदुरबार जिल्ह्याचा मृत्युदर आणि पाॅझिटिव्हिटी रेट वाढला होता. पाॅझिटिव्हिटी रेट थेट ३० टक्क्यांपर्यंत भिडल्याने चिंता व्यक्त होत होती. साधारण एप्रिल मध्यापर्यंत हा रेट कायम होता. परंतु चाचण्यांची घटलेली संख्या, बरे हाेणारे रुग्ण यामुळे जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आता १९ टक्क्यांपर्यंत आला आहे.

आरोग्य विभागाकडून रॅपिड आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्यांची संख्या वाढवली गेल्याने १५ एप्रिलपर्यंत दर दिवसी साधारण तीन ते चार हजारापर्यंत चाचण्या केल्या गेल्या आहेत. यातून बाधित रुग्णांची संख्या ही ५००पेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले होते. गेल्या काही दिवसात मात्र प्रशासनाने नंदुरबार शहर व जिल्ह्याच्या इतर भागातील चाचण्यांची केंद्रे कमी केल्याचे समोर आले आहे. नंदुरबार शहरात रॅपिड टेस्टची केवळ दोनच केंद्र सध्या सुरू आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने मार्च महिन्यात कोरोनाचा धोका लक्षात घेत, रॅपिड ॲंटिजेन टेस्ट सुरू केल्या. यासाठी गावोगावी पथकांची नियुक्ती केली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची पथके नियुक्त करत ग्रामीण भागात लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या करून त्यांना उपचार मिळवून दिले.

नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार तालुक्यात रॅपिड टेस्ट व स्वॅब कलेक्शन करण्यावर भर देण्यात आला. रॅपिड टेस्ट करूनही लक्षणे असलेल्यांचे स्वॅब कलेक्शन करून आरटीपीसीआर लॅबमध्ये तपासण्या करण्यात आल्याने अनेक अडचणी दूर झाल्या.

आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढल्याने अडचणी झाल्या दूर

रॅपिड ॲंटिजेन चाचण्यांमध्ये वाढ झाली असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅॅबची क्षमता वाढवण्यात प्रशासनाला यश आले. तीन महिन्यापूर्वी साधारण दिवसाला एक हजार चाचण्या होणाऱ्या लॅबमध्ये आता दिवसाला दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक चाचण्या होतात.

जिल्ह्यात टेस्ट किटचा साठा मुबलक असल्याने दर दिवशी टेस्टिंग वाढवून समोर आलेल्या बाधितांना उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी ग्रामीण भागात स्वॅब कलेक्शन व रॅपिड चाचणीचे शिबिरे घेण्यात आली होती. अद्यापही ग्रामीण भागात रॅपिड टेस्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. यात रुग्णांची संख्या कमीअधिक प्रमाणात आढळून येत आहेत.

-डाॅ. एन.डी. बोडके

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार