जिल्ह्यात रिक्त बेड्सची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:15+5:302021-05-08T04:32:15+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा ग्राफ कमालीचा घसरल्याने सर्वच शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयांत बेड्स शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले ...

The number of empty beds in the district increased | जिल्ह्यात रिक्त बेड्सची संख्या वाढली

जिल्ह्यात रिक्त बेड्सची संख्या वाढली

Next

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा ग्राफ कमालीचा घसरल्याने सर्वच शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयांत बेड्स शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यातच बेड मिळविण्यासाठी रुग्णांना रुग्णवाहिकेत घेऊन नातेवाइकांना रुग्णालयांच्या दारोदारी फिरावे लागत होते. शुक्रवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार २१ आयसीयू, १६० ऑक्सिजन बेड्स जिल्ह्यात शिल्लक होते, तर तब्बल १,१८९ आयसोलेशन बेड्स सध्या उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा ग्राफ कमालीचा घसरला आहे. दररोज ८०० ते १३०० पर्यंत रुग्णसंख्या आढळत होती. मार्च महिन्याच्या तिसरा आठवडा ते एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकदम वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळणे जिकिरीचे ठरत होते. त्यामुळे थेट सुरत, नाशिक व धुळे येथील रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत होता. आता मात्र परिस्थिती सुधारली असून, जिल्ह्यातच अनेक बेड्स शिल्लक आहेत.

तालुकानिहाय रिक्त बेड्स

जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तसेच सीसीसी सेंटरमध्ये मोठ्या संख्येने बेड्स रिक्त आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून तब्बल ७४८ बेड्स, शहादा तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून १०० बेड्स, नवापूर तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून ११७ बेड्स, तळोदा तालुक्यात केवळ आयसोलेशनचे ६४, अक्कलकुवा तालुक्यात केवळ आयसोलेशनचे २७, तर धडगाव तालुक्यातही केवळ आयसोलेशनचे १३३ बेड्स शिल्लक आहेत. आयसोलेशनच्या एकूण १,१८९ बेड्सचा समावेश आहे.

आयसीयू २१ बेेड्स

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील आयसीयूचे तब्बल २१ बेड्स शुक्रवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार शिल्लक होते. त्यात नंदुरबार तालुक्यात पाच, शहादा तालुक्यात १२, नवापूर तालुक्यात चार बेड्सचा समावेश होता.

ऑक्सिजन बेड्स

ऑक्सिजन बेड्सचीदेखील परिस्थिती सुधारली आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांच्या एकत्रित आकडेवारीनुसार नंदुरबार तालुक्यात ४३, शहादा तालुक्यात ९४, नवापूर तालुक्यात २३ ऑक्सिजन बेड्स शिल्लक आहेत. तळोदा व धडगाव तालुक्यात ऑक्सिजन बेड्स उपलब्धत नाही.

२७ रुग्णालये, ९ केअर सेंटर

जिल्ह्यात शासकीय सात, तर खासगी २० रुग्णालये कोरोनावर उपचार करणारे आहेत. त्यात सर्वाधिक नंदुरबार व शहादा तालुक्यात आहेत. धडगाव व तळोदा येथे एकही खासगी रुग्णालय नाही. अक्कलकुवा येथे जामिया संस्थेच्या दवाखान्यात उपचाराची सोय आहे. याशिवाय शासकीय नऊ कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणावर सोय झाली आहे.

चाचण्या घटल्या

जिल्ह्यात कोरोना चाचण्यादेखील घटल्या आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांत दिवसाला तब्बल दोन ते अडीच हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता त्या हजार ते दीड हजाराच्या मर्यादेत आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटल्याचे बोलले जात आहे. अर्थात, जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळेदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तालुकानिहाय रिक्त बेड्स

जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तसेच सीसीसी सेंटरमध्ये मोठ्या संख्येने बेड्स रिक्त आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून तब्बल ७४८ बेड्स, शहादा तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून १०० बेड्स, नवापूर तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन व आयसोलेशन मिळून ११७ बेड्स, तळोदा तालुक्यात केवळ आयसोलेशनचे ६४, अक्कलकुवा तालुक्यात केवळ आयसोलेशनचे २७, तर धडगाव तालुक्यातही केवळ आयसोलेशनचे १३३ बेड्स शिल्लक आहेत. आयसोलेशनचे एकूण १,१८९ बेड्सचा समावेश आहे.

Web Title: The number of empty beds in the district increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.