शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांची संख्या सात हजाराच्या पार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:03 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात मंदावलेला कोरोना संसर्गाने ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात मंदावलेला कोरोना संसर्गाने गती पकडल्याने ही रुग्ण संख्या वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात ३४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली. सोमवारी रात्री कोरोनाबाधितांची एकूण ६ हजार ९८८ होती. सायंकाळी आलेल्या अहवालात ८० पैकी ३४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर ही संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभरात थेट १२१ जणांना घरी सोडण्यात आले. यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही साडेसहा हजार एवढी झाली आहे. एकीकडे १२१ रुग्ण बरे होवून घरी जात असताना दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६३ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या सात हजाराच्या पुढे गेली असताना शहादा आणि नंदुरबार या दोन शहरातच पाच हजार रुग्ण समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २ हजार ६९९ रुग्ण हे आजवर शहाद्यात तर २ हजार ६४३ रुग्ण हे नंदुरबार शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. या दोन्ही शहर आणि तालुक्यात नवीन रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढल्या आहेत. दरम्यान रुग्णसंख्या वाढली असताना आरोग्य विभागाने स्वॅब संकलनही वाढवले आहे. आतापर्यंत ३८ हजार नागरीकांचे स्वॅब घेतले गेले आहेत.