शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण धारकांना पालिकेतर्फे नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या शहरातील १५० अतिक्रमण धारकांना नगरपालिकेने नोटीसा बजाविल्या असून, तांत्रिक बाबी पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या शहरातील १५० अतिक्रमण धारकांना नगरपालिकेने नोटीसा बजाविल्या असून, तांत्रिक बाबी पूर्ण करून येत्या तीन दिवसात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान बुधवारीदेखील रस्त्यावर अतिक्रमण करणाºया हातगाडीधाकांना पालिकेने समज देऊन पुन्हा लॉºया उभ्या केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शहरातील वाहतुकीस सातत्याने अडथळा ठरणाºया अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी नगरपालिकेने अतिक्रमण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मेनरोड, बाजारपेठ, स्मारक चौक, कॉलेज रोड, बसस्थानक, हातोडा रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कच्चे व पक्के अतिक्रमणे पुढे आली आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे नेहमीच वाहतुकीस डोकेदुखी ठरत असून, या अतिक्रमण करणाºया व्यावसायिकांना पालिकेने आपले अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीसा बजाविल्या आहेत. पालिकेच्या अधिकृत सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार आता पावेतो जवळपास १५० अतिक्रमण धारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.गेल्या मंगळवारपासून पालिका अतिक्रमण मोहिम राबविणार होती. परंतु काही तांत्रिक बाबींबरोबरच कायदेशीर बाबी व महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमण धारकांची चौकशी करुन त्यांनाही आपले अतिक्रमण स्वत:हून काढण्याचा सवलतीच्या दृष्टीने मोहीम सुरू करता आली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु ही कार्यवाही पूर्ण करून येत्या तीन दिवसात मोहीम हाती घेणार असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, बुधवारी मात्र रस्त्यावर अतिक्रमण करणाºया हातगाड्या, लॉरीधारक यांना रस्त्यावरून हटविण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कडक समज दिली. यापुढे हातगाड्या उभ्या केल्यास कारवाई करण्याचा इशारादेखील दिला. याशिवाय पालिका मुख्याधिकारी सपना वसावे व बांधकाम अभियंता शंकर गावीत यांनी शहरातील बसस्थानक परिसर, कॉलेज रोड भागात जावून अतिक्रमणाबाबत पहाणी केली. त्यामुळे लवकरच अतिक्रमण रेषा आखण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा प्रांताधिकारी अविशांत पांडा, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, मुख्याधिकारी वसावे यांनी पाहणी केली होती.४शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण मोहीम हाती घेणार असली तरी वाहतुकीस सातत्याने डोकेदुखी ठरणाºया मोकाट गुरांचा प्रश्नही पालिकेने कायम स्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण ही मोकाट गुरे नेहमीच ज्या ठिकाणी भाजी विक्रेते बसतात अशा बसस्थानक व भाजीमार्केटच्या भागात बसतात. त्यामुळे वाहनचालक व मोठ्या वाहनांच्या वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असते. पालिका अशा पशुपालकांवर कारवाई करीत नसल्याने त्यांचे फावत असून, बिनधास्तपणे हे पशुपालक आपली गुरे सोडून देत असतात. नंदुरबार पालिकेच्या धर्तीवर तळोदा पालिकेने कारवाई केली तर आपोआप मोकाट गुरांचा उपद्रव थांबले. मात्र यासाठी पालिकेने उदासिनता झटकण्याची आवश्यकता आहे.