शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेतर्फे ३५ अतिक्रमणधारकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तळोदा-चिनोदा रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमीतांची अतिक्रमणे पालिकेने सोमवारी हटविली आहेत. दरम्यान या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तळोदा-चिनोदा रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमीतांची अतिक्रमणे पालिकेने सोमवारी हटविली आहेत. दरम्यान या प्रकरणी ३५ अतिक्रमण धारकांना पालिकेने नोटीसादेखील बजाविल्या आहेत. कच्च्या अतिक्रमणाबाबत पालिकेने कारवाई हाती घेतली असली तरी पक्क्या अतिक्रमणाबाबतही ठोस कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.तळोदा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांकडे किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या टपºया व लॉºया लावून अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे नगरपालिकेने अशा व्यावसायिकांना नोटीसा बजावून अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि यावर संबनधीतांनी कार्यवाही न केल्यामुळे नगर पालिकेच्याबांधकाम विभागाने सोमवारी अतिक्रमण मोहित हाती घेतली आहे. या पथकाने शहादा व चिनोदा रस्त्यावरील किरकोळ व्यावसायिकांच्या टपºया हटविल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांनीदेखील मोकळा श्वास घेतला आहे. मंगळवारी पालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबविली असली तरी पुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय अडथळा ठरणाºया सर्वच मार्गावरील अतिक्रमणाबाबत पालिकेमार्फत सर्वेदेखील केला जात असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाºया किरकोळ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली असली तरी शहरात बहुतेक प्रमुख रस्त्यांकडे व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमणे वाढलेले आहेत.तत्कालीन प्रशासनाने ही पुढे आलेली अतिक्रमणे काढली होती. मात्र पालिकेचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे ही अतिक्रमणे पुन्हा मोठ्या प्रमाणात पुढे आली आहेत. साहजिकच वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा अक्षरश: विद्रूप झाला आहे. पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यावसायिकांच्या बाबतीत दुजाभाव न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाहतुकीस अडथळा ठरणाºया पक्या अतिक्रमणांवरही हातोडा चालवावा, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.शहरात मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यावसायिक आहेत. त्यातही लॉरीधारक व टपरीधारकांची संख्या मोठी आहे. व्यावसायिक हे आपल्या लॉºया रस्त्यावरच उभ्या करीत असतात. त्यामुळे नागरिकांना सातत्याने वाहतुकीच्या कोंडीस सामोरे जावे लागत असते. त्यातही नंदुरबार-हातोडा बस मुख्यबाजार पेठेतूनच जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्याचबरोबर मोटारसायकलस्वारदेखील रस्त्याच्या कडेलाच मोटारसायकली उभ्या करीत असतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत असतो. वाहतुकीच्या अशा कोंडीस नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. मात्र तरीही त्यावर उपाययोजना करायला कोणीही तयार नाही. वास्तविक रस्त्यावर उभ्या राहणाºया किरकोळ लॉरीधारक व टपरीधारकांकडून पालिका रितसर महसूल घेते. साहजिकच त्यांना जागा उपलब्ध करुन देणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु त्यावर कार्यवाही केली जात नाही. पालिकेने त्यांना सक्त ताकीद देवून दुसरीकडे जागा उपलब्ध करुन दिली तर वाहतुकीची ही कटकटदेखील दूर होईल. तथापि यावर प्रशासनाने, पदाधिकाºयांनी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.