नंदुरबारमधील 6 गॅस वितरकांना नोटीस

By Admin | Updated: May 25, 2017 17:05 IST2017-05-25T17:05:20+5:302017-05-25T17:05:20+5:30

उज्ज्वला योजनेला भ्रष्टाचाराची काजळी

Notice to 6 gas distributors in Nandurbar | नंदुरबारमधील 6 गॅस वितरकांना नोटीस

नंदुरबारमधील 6 गॅस वितरकांना नोटीस

ऑनलाईन लोकमत/ भूषण रामराजे

नंदुरबार,दि.25- जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान उज्‍जवला गॅस योजनेला भ्रष्टाचाराची काजळी चढली असून योजनेतील लाभार्थी महिलांकडून गॅस वितरकांनी पैसे घेतले आहेत़ पैसे घेणा:या सहा वितरकांना केंद्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत़    
नंदुरबार जिल्ह्यात खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या़ अर्ज भरण्याच्या नावाने 100 रूपये आणि कनेक्शन देण्यासाठी तब्बल 1500 रूपयांर्पयत रक्कम घेतल्याच्या तक्रारी खासदार डॉ़ गावीत यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी संबधित विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकांकडून माहिती जाणून घेतली होती़ या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर केंद्र शासनाने या सहा वितरकांना नोटिसा बजावल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आह़े या प्रकारामुळे जिल्ह्यात गॅसचे वाटप रखडले आह़े येत्या 10 दिवसात जिल्ह्यात तब्बल 20 हजार महिलांना उज्‍जवला अंतर्गत गॅस वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आह़े 

Web Title: Notice to 6 gas distributors in Nandurbar