शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कितीही संकटे येणार तरीही केळी व पपईला पसंती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्यावर्षातील अतीवृष्टी, अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊनने बंद झालेली बाजारपेठ यामुळे शेती उत्पादनाचे मोठे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्यावर्षातील अतीवृष्टी, अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊनने बंद झालेली बाजारपेठ यामुळे शेती उत्पादनाचे मोठे नुकसान गेल्या दोन वर्षात झाले आहे़ या नुकसानीनंतर यंदा शेतकरी फळ पिकांना ब्रेक देणार अशी शक्यता होती़ परंतू जिल्ह्यात याउलट स्थिती असून पपई आणि केळी या दोन पिकांना यंदाही पसंती कायम आहे़
जिल्ह्यात यंदा पावसाने वेळोवेळी खंड देऊनही ९४ टक्के क्षेत्रात पिक पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि मूळ या पिकांचा समावेश आहे़ खरीप हंगामात सर्वाधिक पसंती कापसाला मिळाली असून आजअखेरीस ११७ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे़ यातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान सव्वा लाख हेक्टरवर कापूस दिसून येणार अशी शक्यता आहे़ ९४ टक्के क्षेत्रात झालेल्या पेरण्या कोरड व बागायत क्षेत्रातील असल्याने शेतकरी फळ पिकांना यंदाच् थांबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती़ पंरतू शेतकरी बागायती पिकांची लागवडही तेवढ्याच जोमाने करत आहे़ यातून आंबा, केळी, सिताफळ, लिंबू, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पपई आणि इतर फळ पिके एकूण ११ हजार हेक्टरवर बहरली आहेत़ गेल्या वर्षात ही आकडेवारी केवळ १० हजार हेक्टर होती़ यंदाच्या लागवड हंगामात १ हजार हेक्टरची प्रगती झाली असल्याची माहिती आहे़


४जिल्ह्यात आजअखेरीस २ लाख ७९ हजार १९१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे़ एकूण ९४ टक्के हा पीक पेरा आहे़
४दुसरीकडे जिल्ह्यात ११ हजार ४३ हजार हेक्टर क्षेत्रात फळपिकांची लागवड आहे़ यात ५ हजार ८९ हेक्टरवर केळी तर ४ हजार ८६९ हेक्टरवर पपईची लागवड आहे़
४नंदुरबार तालुक्यात ३३०, नवापूर ३३, अक्कलकुवा ११, तळोदा १ हजार ४५८ तर सर्वाधिक ३ हजार २५६ हेक्टर केळी लागवड ही शहादा तालुक्यात करण्यात आली आहे़
४जिल्ह्यात यंदा सर्वाधिक ३ हजार ३१५ हेक्टर पपई शहादा तालुक्यात आहे़ त्याखालोखाल नंदुरबार १ हजार १६९, तळोदा ३७१ तर नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी सात हेक्टरवर पपई लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ दुसरीकडे भाजीपाला पिकांची आकडेवारीही वाढली असून २२ हजार हेक्टरवर ही पिके डोलत आहेत़


शहादा सर्वात पुढे
खरीप हंगामातील नियमित पिक पेरणीत शहादा तालुक्याने आघाडी घेतली आहे़ तालुक्यात ७४ हजार ८६८ हेक्टर पीक पेरा झाला आहे़ बागायती पिक पेरणीतही तालुका पुढे असून ६ हजार ५७१ हेक्टरवर केळी आणि पपई या या फळ पिकांची लागवड झाली आहे़
कापूस लागवडीत वाढ झाल्याने बागायती क्षेत्रात घट येणार अशी शक्यता होती परंतू जिल्ह्यात आजअखेरीस १ लाख २४ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड पूर्ण झाली आहे़ त्यातुलनेत बागायती क्षेत्र कमी असले तरी इतर जिल्ह्याच्या मानाने पपईचे लागवड क्षेत्र राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे़