शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निगेटिव्ह असल्याशिवाय गुजरातमध्ये प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

तापी जिल्ह्यातील उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक कार्यरत करण्यात आले आहेत. ...

तापी जिल्ह्यातील उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक कार्यरत करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे. नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या सीमावर्ती भागात गुजरात पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. याठिकाणी आरोग्य पथकामार्फत तपासणी करून रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. रिपोर्ट नसल्यास परतीचा प्रवास करावा लागत आहे. निझर येथे तात्काळ रॅपिड टेस्ट करून गुजरात राज्यात जाऊ दिले जात आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक २४ तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची तपासणी करीत आहे.

तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कोरोनाचा उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड चाचणीचे कॅम्प लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेकडो वाहने महाराष्ट्रात परत पाठविण्यात आले

बुधवारी संध्याकाळी गांधीनगरहून आरोग्य विभागाचे आदेश आल्याने आम्ही तात्काळ नवापूर-उच्छल सीमावर्ती भागात पोलिस बंदोबस्त लावून तात्काळ महाराष्ट्रातील वाहने गुजरात राज्यात जाण्यासाठी अटकाव केला. एकही वाहन आम्ही जाऊ दिले नाही. २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जातो. शेकडो वाहने महाराष्ट्र राज्यात परत पाठविण्यात आले.

-राजकुमार लोह, पोलीस उपनिरीक्षक,उच्छल पोलीस स्टेशन पोलीस

गुजरात राज्यात बंदी असल्याने कोरोना उपचार कसा घ्यावा?

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर येत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहेत. बहुतांश नागरिक चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घेऊन जात असतात. परंतू गुजरात राज्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जाईल असा आदेश आल्याने गुजरात राज्यातील कोरोना उपचार करण्यासाठी कसे जावे असा प्रश्न पडला आहे.

आड मार्गाने वाहने रवाना

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कोरोना रिपोट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने वाहन चालकांनी आडमार्गाने गुजरात राज्यात वाहने रवाना केली. काहींनी तर आपली महाराष्ट्र पासिंग ची वाहन नवापूरला लावून गुजरात राज्याचे वाहन भाड्याने करून रवाना झाले.