शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजना समितीची बैठक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

शासकीय कार्यालयात शुकशुकाट कायम नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ शासकीय कर्मचारीच दिसून येत आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय ...

शासकीय कार्यालयात शुकशुकाट कायम

नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ शासकीय कर्मचारीच दिसून येत आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून शुकशुकाट पसरला आहे.

राज्य मार्गाच्या दुरुस्तीमुळे दिलासा

नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा ते नाशिक जिल्ह्यातील विंचूर या राज्य मार्गाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होते. कोरीट मार्गाने वडबारे, रनाळे, शनिमांडळ मार्गाने विंचूरकडे जाणारा हा राज्य मार्ग आहे. यासाठी बांधकाम विभागाने सातत्याने निधी दिला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात शनिमांडळ गावातून बायपास निघण्याची शक्यता आहे.

मिनी बसस्थानक हवे

अक्कलकुवा : तालुक्यातील खापर येथे मिनी बसस्थानक निर्माण करण्याची जुनी मागणी आहे. खापर मार्गाने गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या मोठी आहे. या बसेस खापर गावात काही काळ विश्रांती घेतात. परंतु योग्य जागा नसल्याने बसेस रस्त्यावर थांबवण्यात येतात.

दुरुस्त्या टळल्या

नंदुरबार : जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत साधारण ५०० ग्रामपंचायतींनी जलकुंभांची उभारणी करत पाणी योजना सुरू केली होती. या पाणी योजनांचा बोजवारा उडाला असून, वर्षानुवर्षे जलकुंभांची दुरुस्ती टळत आहे. काही ठिकाणी जलकुंभ कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बऱ्याच वर्षांपूर्वी सार्वजनिक हाैद अर्थात गावहाळ तयार करून घेतले होते. परंतु कालांतराने तेथील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने हाैद निरुपयोगी ठरत आहेत. यातून गुरांना बंधारे किंवा साचून असलेले पाणी देण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.

विजेचा लपंडाव

नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा, पातोंडा, राकसवाडे, दुधाळे आणि होळ तर्फे हवेली शिवारातील वसाहतींमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. यातून नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून वीज पुरवठा अनियमितपणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, कारवाईची मागणी आहे.

झुडपे वाढली

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत. ही झुडपे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. ग्रामपंचायतींनी ही झुडपे काढण्याची कारवाई करावी, अशी मागणी आहे. झुडपांमुळे किरकोळ अपघात होत आहेत.

रॅपिड टेस्ट केंद्रांवर सामसूम

नंदुरबार : आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात रॅपिड अँटिजन चाचण्या व आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी स्वॅब संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गेल्या महिन्यात नागरिकांच्या रांगा लागत होत्या. परंतु गेल्या चार दिवसात मात्र ही केंद्र सामसूम आहेत. कोरोनाबाधितांची संख्या तसेच लक्षणे असलेल्यांची संख्या घटली असल्याने केंद्रांवर नागरिक येत नसल्याचे सांगण्यात आले .

कांदा आवक घसरली

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून होणारी कांदा आवक कमी झाली आहे. यातून किरकोळ बाजारात कांदा दर काहीअंशी वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार दिवसात ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात हजेरी लावलेली नाही. शेतकरी कांदा साठा करण्यावर भर देत आहेत.

मास्कला मागणी

नंदुरबार : शहरातील विविध भागातील मेडिकल व किरकोळ विक्रेत्यांकडून मास्कची खरेदी वाढली आहे. नागरिक एन-९५ तसेच दोन पदरी मास्कला पसंती देत आहेत. शहरात मेडिकल दुकानांसोबतच काही विक्रेते छोटे स्टाॅल लावून मास्कची विक्री करत आहेत.