निलांती ऐबेगुणरत्ने यांना लागला श्री चक्रधर स्वामींचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:43 IST2020-02-01T12:42:51+5:302020-02-01T12:43:03+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केवळ व्हाटस्अपवरील संवादातून भगवान श्री चक्रधर स्वामी यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या ...

Nilanti Abegunaratne felt the power of Sri Chakradhar Swami | निलांती ऐबेगुणरत्ने यांना लागला श्री चक्रधर स्वामींचा लळा

निलांती ऐबेगुणरत्ने यांना लागला श्री चक्रधर स्वामींचा लळा

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केवळ व्हाटस्अपवरील संवादातून भगवान श्री चक्रधर स्वामी यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विचारांच्या शोधासाठी थेट भारतात येऊन महानुभाव पंथ स्विकारणाऱ्या श्रीलंकेचे माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण ऐबेगुणरत्ने यांच्या पत्नी निलांती ऐबेगुणरत्ने ह्या अक्षरश: भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडल्या आहेत. वर्षभरात त्यांनी भारतात दोनवेळा भेटी देऊन महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानावर भेट देऊन ते विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
श्रीलंका या देशात आजही रामायणातील अनेक संदर्भस्थाने आहेत. याच देशात सीतेचे मंदिरही आहे. त्याठिकाणी दरवर्षी रामकथा होतात. या देशात अनेक शाळा-महाविद्यालयात महात्मा गांधी जयंतीही साजरा होते. अर्थात भारतीय परंपरेतील अनेक संदर्भ या देशाशी जुळले असले तरी तेथील संस्कृती मात्र वेगळी आहे. याच देशातील माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण ऐबेगुणरत्ने यांच्या पत्नी निलांती ह्या आपल्या पतीचा आॅप्टीकलचा व्यवसाय सांभाळतात. श्रीलंकेत ५० पेक्षा अधिक ठिकाणी त्यांच्या व्यवसायाच्या शाखा आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच त्या व्हाट्सअपच्या माध्यमातून पुण्यातील पवन नावाच्या तरुणाशी संपर्क आला. व्हाट्सअपच्या संवादातून काही अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. तेव्हा पवनने महानुभाव पंथाबाबत माहिती दिली. या पंथाचे सध्याचे जाधववाडी, जि.पुणे येथील मोठेबाबा नरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर यांचीही माहिती देऊन त्यांचा फोटो पाठविला. हा फोटो पाहून त्या प्रभावीत झाल्या आणि थेट त्यांना भेटण्यासाठी भारतात आल्या. येथे आल्यानंतर त्यांनी महानुभाव पंथाची माहिती घेतली. त्याबाबत त्या अधिक आकर्षित झाल्या. त्यावेळी नरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर यांच्या वाकी, जि.अमरावती येथे प्रवचन सुरू होते. तेथेच त्यांची भेट घेऊन निलांती ऐबेगुणरत्ने यांनी त्यांच्याकडून उपदेश घेतला व महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. बाबांनी त्यांचे सांप्रदायिक नाव ‘कृष्णप्रिया’ असे ठेवले आहे.
दरम्यान, महानुभाव पंथ स्वीकारल्यानंतर कृष्णप्रिया अर्थात निलांती ह्या दोनवेळा भारतात येऊन गेल्या. सध्याही त्या भारतात आहेत. येथील महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांवर भेट देऊन सर्व माहिती व श्री चक्रधर स्वामींचे विचारही जाणून घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही समशेरपूर येथील श्रीकृष्ण मंदिर व सारंगखेडा येथील दत्त मंदिरावर त्यांनी भेटी दिल्या आहेत.

Web Title: Nilanti Abegunaratne felt the power of Sri Chakradhar Swami