गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोना आणि इंटरनेटने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:18+5:302021-06-22T04:21:18+5:30

नंदुरबार : गुन्हेगारीचा चेहरा बदलू लागला असून, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. इंटरनेटच्या महाजालाचा आधार घेऊन अल्पवयीन गुन्हेगारांसह कसलेल्या ...

New faces in crime; Corona and the Internet increased police headaches | गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोना आणि इंटरनेटने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोना आणि इंटरनेटने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

नंदुरबार : गुन्हेगारीचा चेहरा बदलू लागला असून, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. इंटरनेटच्या महाजालाचा आधार घेऊन अल्पवयीन गुन्हेगारांसह कसलेल्या गुन्हेगारांनी आपल्या गुन्हेगारीच्या वेगळ्या तऱ्हा आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आता तपासाची दिशा बदलावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात घडलेल्या अनेक गुन्ह्यातून ते सिद्ध होत आहे.

सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. त्यात गुन्हेगारी कशी मागे राहील? पूर्वी गुन्हेगार एकमेकांच्या क्लृप्त्या किंवा ट्रेण्ड वापरून गुन्हे करीत होते. आता मात्र हातातल्या मोबाइलमध्ये संपूर्ण जग सामावले असल्यामुळे त्यातून गुन्हेगारीच्या प्रथा व प्रकारदेखील बदलू लागला आहे. त्यात सर्वाधिक प्रकार हा सोशल मीडिया माध्यमातून फसवणुकीचे आहेत. याशिवाय लहान मुलंदेखील इंटरनेटच्या माध्यमातून चोरी, जबरी चोरीसह विनयभंगसारखे प्रकार करत आहेत. या सर्वांमुळे मात्र पोलिसांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पारंपरिक तपासाची दिशा बदलून हायटेक तपासावर आता पोलिसांना भर द्यावा लागत आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनादेखील प्रशिक्षित करावे लागत आहे.

Web Title: New faces in crime; Corona and the Internet increased police headaches