शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याने ४० ऑक्सिजन बेडचे नवीन कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

नवापूर शहरातील टाऊन हॉलचे कोविड सेंटर पूर्ण बंदिस्त करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची ...

नवापूर शहरातील टाऊन हॉलचे कोविड सेंटर पूर्ण बंदिस्त करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत पूर्ण परिसर बंदिस्त करण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील खासगी कोविड सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा फी घेण्याचे थांबविण्यात यावे, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक भोये यांची पाहणी

नवापूर शहरातील ४० बेडच्या ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका कीर्तीलता वसावे, कोविड सेंटरचे प्रमुख डाॅ. युवराज फडके यांनी भेट देऊन पाहणी केली.

टाऊन हॉलमधील कोविड सेंटरसाठी दुरुस्ती

शहरातील टाऊन हॉलमध्ये एक मोठा हाॅल, तीन रूमस, डॉक्टर व नर्स अशी उपलब्धता करण्यात आली आहे. टाऊन हॉलमध्ये स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच लाइट, फॅन, संडास, बाथरूमची दुरुस्ती करीत कोविड सेंटर दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे. ऑक्सिजनसाठी पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

पुरेशा संख्येत डाॅक्टर व नर्ससह आरोग्य कर्मचारी द्यावे

नवापूर शहरातील टाऊन हॉलमध्ये ४० वेळचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी यांचीदेखील नेमणूक पुरेशा संख्येमध्ये करणे गरजेचे आहे. नवापूर शहरातील काही खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

ग्रेस हॉस्पिटलचे कोविड सेंटर सुरू होणार

गेल्या ग्रेस हॉस्पिटल, करंजी (खुर्द), नवापूर येथे कोविड रुग्ण सेवा सुरू करण्यात आले आहे. काही कारणास्तव बंद असलेले कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कोविड सेंटरसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची लवकर मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे, असे ग्रेस हॉस्पिटलचे संचालक जोशवा पुनूस यांनी सांगितले आहे.