उपेक्षित होमगार्ड मानधनापासूनही वंचीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST2021-02-20T05:30:55+5:302021-02-20T05:30:55+5:30

नंदुरबार : सण, समारंभांच्या वेळी बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यावर नेहमीच उभा राहणारा होमगार्ड मात्र मानधनासाठी नेहमीच प्रतिक्षा ...

Neglected Homeguard deprived of honorarium | उपेक्षित होमगार्ड मानधनापासूनही वंचीतच

उपेक्षित होमगार्ड मानधनापासूनही वंचीतच

नंदुरबार : सण, समारंभांच्या वेळी बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यावर नेहमीच उभा राहणारा होमगार्ड मात्र मानधनासाठी नेहमीच प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक, कोरोना बंदोबस्त तसेच नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याची कैफियत होमगार्ड जवानांनी मांडली.

होमगार्ड जवान हे नेहमीच दुर्लक्षीत राहत असतात. केवळ बंदोबस्ताच्या वेळीच त्यांची आठवण येते. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करणारा हा जवान मानधनाबाबतही उपेक्षीतच असतो. गणेशोत्सव असो किंवा कुठल्याची ठिकाणचा यात्रात्सोव असो होमगार्ड जवान त्या ठिकाणी तैणातीला असतातच. याशिवाय मोठ्या नेत्यांचे दौरे, निवडणुका, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यावर होमगार्ड तैणात असतो. कोरोना काळात तसेच लॅाकडाऊनमध्ये देखील होमगार्ड जवान कर्तव्यापासून हटला नाही. असे असतांनाही त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याची त्यांची कैफियत आहे. सामान्य कुटूंबातील हे जवान आपल्या कर्तव्याचा मोबदला तरी वेळेवर मिळावा यासाठी आग्रही असतात, परंतु शासकीय कामकाजचा फटका त्यांना बसतो.

व्यवसाय सांभाळून काम

n होमागर्ड जवान हे सामान्य परिस्थितील असतात. कुणी रिक्षा चालक, कुणी टपरी चालक तर कुणी इतर व्यवसाय करतात. अशा वेळी जर त्यांना ऐनवेळी बंदोबस्तासाठी बोलवणे आले तर व्यवसाय सोडून बंदोबस्ताला हजर राहावे लागते.

Web Title: Neglected Homeguard deprived of honorarium