शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त वळणाची तीव्रता कमी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

शहादा-खेतिया मार्गावर दरा फाट्याजवळील सुसरी धरणाचा विचार करून ‘एस’ आकार असलेला वळण रस्ता काढण्यात आला आहे. या मार्गावरील ...

शहादा-खेतिया मार्गावर दरा फाट्याजवळील सुसरी धरणाचा विचार करून ‘एस’ आकार असलेला वळण रस्ता काढण्यात आला आहे. या मार्गावरील भरधाव वेगाने वाहनाचा तोल वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनावर आदळल्याचे चित्र नेहमी पहावयास मिळते. यामुळे लहान-मोठे अपघातही नेहमी होतात.

सध्या कोळदा-खेतिया या आंतरराज्य मार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची संख्या वाढेल. त्यामुळे या वळणावर अपघाताचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक या रस्ता बांधणीच्या तांत्रिक चुकांमुळे वळण धोकादायक बनले आहे. इंग्रजी 'एस' आकाराच्या सलग वळणामुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे अपघातास प्रतिबंध करणाऱ्या कोणत्याही सुविधा नाहीत. यापूर्वी याठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

वळणाची तीव्रता कमी करणे आवश्यक

शहादा-खेतिया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करण्यात येते. त्यामुळे सुसरी धरणाला जोडून असलेल्या वळणावर वाहनाचा तोल जाऊन अनेक अपघात होत असतात. शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाला लागून ‘एस’ वळणाची तीव्रता कमी करणे गरजेचे आहे. तीव्र वळणाचा धोका काढून उपाययोजना होणे गरजेचे आहे.