शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पुन्हा जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

बँकांसोबत मिनी बँकाही गजबजल्या नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी मिनी बँका सुरू करण्यात आल्या आहेत. ...

बँकांसोबत मिनी बँकाही गजबजल्या

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी मिनी बँका सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या बँकांमध्ये विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची रक्कम आली असल्याने लाभार्थी बँकांसोबत मिनी बँकांमध्येही गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.

पाणी योजना निर्मितीचे प्रस्ताव रखडले

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासाठी २३ प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रस्तावांवर कारवाई होण्याची अपेक्षा होती. परंतु संपूर्ण उन्हाळा संपूनही प्रस्तावांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

खांडबारा ते वाटवी रस्ता धोकेदायक

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा ते वाटवीदरम्यानचा रस्ता अपघाती ठरत आहे. या रस्त्यावर खडी उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यातून रस्ता धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने रात्री प्रवास करणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

तळोद्यात कचऱ्यातील धूळ ठरतेय त्रासदायी

तळोदा : शहरातील चिनोदा चाैफुलीलगत असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. हा कचरा डेपो रस्त्याच्या कडेला असून त्यातून उडणारी धूळ या भागातील वसाहतींमध्ये जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

करण चाैफुलीवरील खड्डा पुन्हा त्रासदायक

नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर बायपास रोडकडे जाणाऱ्या वळणालगतचा मोठा खड्डा वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. हा खड्डा बुजविण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. शेवाळी नेत्रंग महामार्गावरील या चाैफुलीवरून मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते. या भागातून शहरात येणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. दरम्यान या ठिकाणी खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

उपाययोजना करण्याची मागणी

नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबारदरम्यान शेवाळी-नेत्रंग महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या भरण्याची मागणी आहे. साईडपट्ट्यांअभावी हा रस्ता अरुंद होत असून, अपघातांची मालिका सध्या या रस्त्यावर सुरू असल्याचे वेळोवेळी समोर येत आहे.

गतिरोधक टाकूनही वाहनांचा वेग कायम

आष्टे : नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे नंदुरबार ते साक्रीदरम्यान होणारी भरधाव वेगातील वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. आष्टे बसस्थानक परिसरात गतिरोधक टाकून भरधाव वेगातील अवजड वाहने येथून मार्गस्थ होत असल्याचे दिसून आले आहे.

नंदुरबारात रस्त्यावर करावी लागते पार्किंग

नंदुरबार : शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेबाहेर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने नागरिक त्यांची वाहने थेट रस्त्यावर लावून बँकेची कामे उरकत आहेत. यातून या मार्गावर जाणाऱ्या इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असून, वाहतूक शाखेकडून समज देऊनही नागरिकांची वाहने रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अंधारे चाैक तसेच अमृत चाैकातील बँकेबाहेरही वाहने लावण्यास जागा नसल्याने रस्त्यात वाहने लावली जातात.

सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडून गेल्या काही वर्षांपूर्वी १४ व्या वित्त आयोगातून सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाली असून नव्याने स्वच्छतागृहे बांधण्याची गरज आहे.

पालिकेने शिल्पकृती स्वच्छ करावीत.

नंदुरबार : शहरातील विविध भागांत लावण्यात आलेले पुतळे तसेच शिल्पाकृतींची स्वच्छता करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विविध चाैकांमध्ये पालिकेने सुशोभीकरणांतर्गत शिल्पाकृती उभारल्या आहेत. यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे.