शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे एनसीसी कॅम्पचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

या कॅम्पच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस ...

या कॅम्पच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते. या वेळी महेश पाटील यांनी छात्रसैनिकांना आपल्या जुन्या आठवणी सांगत एनसीसीचे युनिटी ॲण्ड डिसिप्लिन या ध्येयावर चालते आणि तेच ध्येय आपण समोर ठेवले तर यश गाठता येते, असा कानमंत्र दिला. कळमकर म्हणाले की, छात्रसैनिकांनी एनसीसीमधून संघटन कौशल्य आत्मसात करावे व समाजाभिमुख होऊन देशाची सेवा करावी, असा सल्ला दिला. छात्रसैनिकांच्या यशस्वी कामगिरीसाठी त्यांना बेस्ट कॅडेट, बेस्ट ड्रिल, बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन, बेस्ट स्पीच, बेस्ट म्युझिकल टीम, बेस्ट स्पिरिट अशा विविध बाबींसाठी प्रशस्तपत्र, स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. त्यात सूरज कोकणी व प्रकाश ठाकूर यांना बेस्ट कॅडेट अवॉर्ड देण्यात आला. या पाच दिवसीय कॅम्पदरम्यान ड्रील मॅप रीडिंग बॅटल फिल्ड क्राफ्ट, राष्ट्रीय एकात्मता, सायबर सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी, लीडरशिप व टीम बिल्डिंग कौशल्य आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कॅम्पदरम्यान ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विवेक भट्टारा, नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, बटालियनचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल समीर बोडसे व सुभेदार मेजर शेखावत यांनी छात्रसैनिकांना भेट देऊन मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, सुभेदार राजेंद्र सिंग व हवालदार उमेश भगत उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे अधिकारी लेफ्टनंट विजय चौधरी, परिचय कॅप्टन विलास वाघ यांनी तर आभार कॅप्टन राहुल पाटील यांनी मानले.