शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर : रेशनसाठी आधार लिंक बंधनकारक; अन्यथा १० फेब्रुवारीपासून अन्नधान्य मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिंक करणे आवश्‍यक आहे. याकरिता रेशन दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक लिंकचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. याकरिता १० फेब्रुवारी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक मोबाईल क्रमांक देण्याच्या उद्दिष्टाने नवापूर तालुक्यात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्त भाव दुकानदारांमार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत आधार लिंक न झालेल्या लाभार्थ्यांची दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी पूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवापूर तालुक्यातील एकूण ६२ हजार रेशन कार्डधारक आहेत त्यातून ३८ हजार २१५ कार्डधारकांनी आधार लिंकिंग करणे बाकी आहे. रेशनकार्डधारकांनी ११ दिवसाच्या मुदतीत आधारकार्ड लिंकिंग करणे गरजेचे आहे. रविवारीदेखील रेशनकार्ड रेशन दुकानात लिंकिंग केले जाणार आहे.

केवायसी पडताळणी व मोबाईल लिंक सुविधा प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानात आणि संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्ध आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी

रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन संबंधित रास्त भाव धान्य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी करावी

संबंधित लाभार्थींनी वैयक्तिकरीत्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा ई-पॉस मशीनवर द्यावयाचा आहे.

कुटुंबातील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक देणे आवश्‍यक आहे. यातून रेशनकार्डमधील भ्रष्टाचाराला लगाम लागणार आहे.