शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाहने फसत असल्याने राष्ट्रीय महामार्ग थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण रखडल्याने रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. धावती वाहने रस्त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण रखडल्याने रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. धावती वाहने रस्त्यात फसुन जाणे व रस्त्याच्या कडेला पलटी होणे असे प्रकार वाढीस येत आहेत. यातून रहदारीचा खोळंबा, अपघात, वित्त व जीवीतहानी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.आर्थिक संकटात सापडलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व चौपदरीकरण करणारी कंपनी यामुळे कोंडाईबारी ते बेडकी या 55 किलोमिटर अंतराची अक्षरश:         चाळण झाली आहे. दरदिवशी तीन हजाराहून अधिक वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्गाचे ठराविक  अंतरात झालेले काम कुचकामी             ठरले आहे. जेथे काम बाकी होते            असा रस्त्याचा भाग तर जीवघेणा            ठरु लागला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात  झालेल्या अतिवृष्टीमुळे रायंगण शिवारातील ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याने महामार्ग बंद   पडला. संवेदनशिल घटना घडल्यानंतर त्याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक असतांनाही महामार्ग प्राधिकरण झोपेचे सोंग घेऊन राहिले. पाईपचा पुरवठा केल्याखेरीज ते ही जास्त काही करु शकले नाही. दररोज सुमारे दोन कोटीचे नुकसान होत असल्याचे पाहून महामार्गावर व्यवसाय करणारे सर्वस्तरातील व्यापा:यांनी एकत्र येवून मातीचा भराव करीत 12 दिवसानंतर महामार्ग पूर्ववत सुरु करण्यात यश मिळविले. रायंगण येथील मोठा पुल व शहरालगतचा वाकीपाडा येथील पुल कधी  कोसळेल हे सांगणे कठीण झाले असतांना आता महामार्गाची नव्याने केलेली उभारणी जीवावर बेतत  आह़े एकाच दिवसात पानबारा जवळ दोन वेगवेगळी वाहने रस्यावर चिखलात रुतून गेली तर विसरवाडी जवळ एक ट्रक  पलटी झाला. एकाच दिवसात तीन अपघात झाल्याने वाहन मालकांचे आर्थिक नुकसान झाले आह़े यातून वाहतुकीचा खोळंबाही झाला़ यातून अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.या घटना नित्याच्या झाल्या असुन लहान चारचाकी वाहने फसुन जातील इतके मोठ्या आकाराचे खड्डे महामार्गावर झाले आहेत. रस्त्यावरील डांबराचा थर निघुन गेला आहे व मातीचा भाग वर आल्याने  मोठी वाहने रुतुन जातील अश्या अवस्थेत चिखल झाला आहे. याचा अंदाज येत नसल्याने अश्या घटना वाढीस येत आहे. महामार्गाचा कोणी वालीच नसल्याने व चौपदरीकरण रखडल्याने या घटना घडत आहेत़ या घटनांना कसा व केव्हा पायबंद घातला  जाईल, असा जटील प्रश्न चर्चिला जात आह़े