शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कला शिक्षकांचे प्रकाशा येथे नाशिक विभागीय शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत जिल्ह्यातील कला शिक्षकांसाठी व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत जिल्ह्यातील कला शिक्षकांसाठी व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघटनेतर्फे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, प्राचार्य आय.डी. पटेल, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, विभागीय अध्यक्ष सुनील महाले, प्रल्हाद ठाकूर, मोहन पटेल, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुरव, भूषण         व:हाडे, सुजाता गारोळे, अनिता पाटील, सचिव संकेत माळी आदी उपस्थित होते.मोतीलाल पाटील म्हणाले की, कलाशिक्षक आपल्या चित्रातून बोलतो. विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ते करतात. मागीलवर्षी कला शिक्षकांच्या तासिका कमी करून त्यांच्यावर अन्याय झाला होता. मात्र आता तासिका पूर्ववत करण्यात आल्याने समाधान वाटते. शिबिरातून कला शिक्षकांना विविध प्रात्यक्षिके मिळतात म्हणून अशी शिबिरे नियमित आयोजित करायला पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. सुनील महाले यांनी संघटनेचे महत्त्व सांगितले. तर प्रल्हाद साळुंखे यांनी शिक्षकांवर अन्याय होणार नाही, ज्याच्यावर अन्याय झाला त्यांच्यामागे संघटना खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले. दुपारच्या सत्रात नरेंद्र सरोदे यांनी वॉटर कलरमध्ये निसर्ग चित्र, धनराज पाटील यांनी काळ्या रंगाच्या शाईने कलाशिक्षकाचे काटरून, योगेश सोमवंशी यांनी पोस्टर रंगात निसर्गचित्र, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी तैल रंगांमध्ये पोटट्रेड करून दाखवले. हेमंत पाटील यांनी संगीत विषयावर मार्गदर्शन केले. भूषण व:हाडे यांनी कला शिक्षकांसाठी बाजारात कोणकोणते नवीन साहित्य आले        आहे याची ओळख प्रोजेक्टवर करून दिली. प्रास्ताविक नरेंद्र गोरख गुरव यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू          जोंधळे यांनी तर आभार प्रल्हाद ठाकूर यांनी मानले. शिबिरासाठी संकेत माळी, राजेंद्र राजपूत, मनोज मगरे, विष्णू माळी, चंद्रशेखर चौधरी, अशोक मराठे, विशाल कर्णकार, कलीम पिंजारी, रमेश चव्हाण, संजय पाटील, दिनेश पाटील, गणेश चौधरी, सुलक्षणा पाटील व स्काऊटच्या विद्याथ्र्यानी परिश्रम घेतले.