शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेचा लहान व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.कोरोनामुळे २२ मार्चपासून संपुर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. साधारणत: अडीच ते तीन महिने पुर्ण व्यवहार बंद होते. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू होते. जून महिन्यापासून काही अंशी शिथीलता आली. परंतु तरीही व्यवहाराची गाडी रुळावर येण्यासाठी आॅगस्ट उजाडला होता. अद्यापही अनेकांचा व्यवसाय रुळावर आलेला नाही. काही लहान व्यवसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती पहाता पालिकेने या व्यावसायिकांच्या मदतीला धावण्याचा निर्णय घेतला आहे.नंदुरबार पालिकेचे शहरातील सर्वच भागात व्यापारी संकुल आहेत. त्यात अनेक दुकाने ही भाड्याने देण्यात आली आहेत. भाड्याने दुकान घेणाऱ्यांमध्ये किराणा, कटलरी, केश कर्तनालये, फळ, भाजीपाला विक्रेते यासह इतर लहान मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. दुकाने बंद असतांना त्यांचे भाडे भरावे लागणार असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेता नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा व्यावसायिकांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान तीन महिन्याचे भाडे माफ केले जाणार आहे. त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबधीतांना देण्यात आले आहेत. लवकरच याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला जाणार असल्याची माहितीही नगराध्यक्षांनी दिली.या निर्णयामुळे लहान, मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पालिकेने नेहमीच सर्वसामान्य नागरिक आणि लहान, मोठ्या व्यावसायिकाचे हित पाहिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यावयिसाकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. असा निर्णय घेणारी नंदुरबार पालिका ही पहिलीच ठरणार आहे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्षा, नंदुरबार.