शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी झालेल्या जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला़ सकाळी सात वाजेपासून सुुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी झालेल्या जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला़ सकाळी सात वाजेपासून सुुरु झालेल्या जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शुकशुकाट होता़नंदुरबार शहरात सातवाजेपासून पूर्णपणे कर्फ्यूचे पालन करण्यात येत होते़ बहुतेक जणांनी सात वाजेपूर्वीच गरजेची कामे पूर्ण करुन घेत घरात राहणे पसंत केले होते़ यामुळे शहरात केवळ औषधी विक्रीची दुकाने सुरु होती़ दूधविक्रेते, पेपरविक्रेते यांनी सकाळी सातवाजेपूर्वी कामे आटोपून कर्फ्यूत सहभाग घेतला होता़ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे खाजगी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच पालिका रुग्णालयाचे कामकाज नियमित सुरु होते़ रेल्वेस्टेशन व बसस्थानक याठिकाणी संपूर्णपणे शुकशुकाट होता़ दिवसभरात बसस्थानकातून एकही बस सुटलेली नव्हती़ पुणे, मुंबई आणि गुजरात राज्यातील विविध शहरांमधून येणाऱ्या खाजगी बसेसही रविवारी शहरात दाखल झालेल्या नव्हत्या़दरम्यान रेल्वेस्थानकात पोलीस व आरोग्य विभाग यांचे पथक तैनात करुन बाहेरगावाहून येणाºया प्रवासी रेल्वेगाड्यांची प्रवास करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली़ आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली होती़ एकीकडे पथक शहरात तपासणी करत असताना दुसरीकडे शहरात येणाºया विविध मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात करुन वाहनधारकांची चौकशी करण्यात येत होती़ वाका ते नंदुरबार दरम्यान पथराई फाटा, धुळे चौफुली, सिबी पेट्रोलपंप यासह विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करुन आढळून येणाºया एखाद-दुसºया वाहनधारकाची तपासणी करुन माहिती घेतली होती़ शहरातील विविध भागात पोलीस कर्मचाºयांनी दिवसभर गस्त करुन माहिती घेतली होती़जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी बस सेवा सकाळपासून बंद असल्याने बसस्थानकांमध्ये शुकशुकाट होता़ दिवसभरात जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे चार बस आगार बंद होते़ यामुळे तब्बल ५० लाख रुपयांचे दैनंदिन नुकसान झाले असून २ हजार बसफेºया होवू शकलेल्या नाहीत़ रात्री ९ नंतर कर्फ्यू समाप्त झाल्यानंतरही बसेस सोडण्याचे आदेश नसल्याने या बसेस पुन्हा सोमवारी सकाळी रस्त्यावर येण्याची चिन्हे आहेत़एसटीच्या नंदुरबार, नवापुर, अक्कलकुवा आणि शहादा आगारालाही रविवारी दिवसभर बस फेºया रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाले होते़ त्यानुसार कारवाई करत चारही आगार मिळून दीड हजाराच्या जवळपास चालक आणि वाहकांना सुटी देण्यात आली आहे़ कार्यशाळा व कार्यालयीन कर्मचाºयांना रविवारी सुटीच असल्याने त्यांना कामावर बोलावण्यात आलेले नव्हते़२०१८ नंतर चारही बसस्थानकांवर भर दिवसा शुकशुकाट असल्याचे यावेळी दिसून आले होते़५० लाखाचे नुकसाननंदुरबार बस आगाराच्या नियमित होणाºया ६७६, शहादा आगारातील ७५०, नवापुर आगारातील ३६५, अक्कलकुवा आगारातील २४० अशा एकूण २ हजार बसफेºया रद्द झाल्या आहेत़ नंदुरबार आगारातील ५७६, नवापुर आगारातील २३५, अक्कललकुवा २४० तर शहादा आगारातील ५०० कर्मचारी सुटीवर होते़ यांत्रिकी कार्यशाळा आणि चालक-वाहक यांना संपूर्णपणे सुटी देण्यात आली होती़ नंदुरबार आणि शहादा आगारात सतर्कता म्हणून काही कर्मचाºयांना सूचित करुन ठेवण्यात आले होते़़ परंतू आपत्कालीन स्थितीच न उद्भवल्याने हे सर्व चालक-वाहक घरी बसून होते़ रविवारी दिवसभरात बस फेºया रद्द झाल्याने नंदुरबार आगाराचा दररोज होणारा ४२ होणारा ३३९ हजार किलोमीटर, नवापुर २४ हजार , शहादा ३४ हजार तर अक्कलकुवा आगाराचा १४ हजार किलोमीटर बसेसचा प्रवास थांबला आहे़ नंदुरबार आगारातून दररोज होणाºया बसफेºयांच्या माध्यमातून १५ लाख रुपये, शहादा बस आगाराचे १५ लाख रुपये नवापुर ९ लाख ५० हजार तर अक्कलकुवा आगाराच्या ७ लाख ५० हजार रुपयांच्या महसूली उत्पन्नावर यामुळे पाणी फेरले गेले आहे़ रविवारी जनता कर्फ्यू पूर्ण झाल्यानंतरही सोमवारी बसेस सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश महामंडळाकडून मिळालेले नसल्याची माहिती चारही आगाराच्या प्रमुखांकडून देण्यात आली होती़ यामुळे सोमवारी सेवा नेमकी कशी मिळणार याबाबत माहिती मिळू शकलेली नव्हती़ परंतू गरेजेचे कर्मचारी कामावर येणार असून उर्वरित चालक-वाहक सुटीवरच राहण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़खाजगी प्रवासी वाहने बंदजनता कर्फ्यूत सर्वच जण सहभागी झाल्याने नंदुरबार बसस्थानक परिसर ओस पडला होता़ या भागात खाजगी टॅक्सी बºयाच वेळा सुरु राहतात़ परंतू रविवारी या टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या़ एकही टॅक्सी सकाळी स्टँडवर आली नव्हती़ यामुळे रेल्वेने घरी परतलेल्या एकदोन जणांना जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये जाण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली़ घरात थांबवण्याचे आदेश असले तरी काही जण प्रवास करुन जिल्ह्यात पोहोचले होते़रस्त्यांवरच्या गुरांना चाºयाची प्रतिक्षाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे संपूर्ण शांत झालेल्या नंदुरबार शहरात सकाळपासून केवळ मोकाट कुत्रे आणि गुरे दिसून आली़ शहरातील माणिक चौकात सेवाभावी नागरिक गुरांना चारा टाकून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करतात़ बंदमुळे चारा विक्री करणाºया महिलाच न आल्याने गुरांची आबाळ झाली़ सायंकाळी नागरिकांनी मार्ग काढून चारा टाकून देत गुरांची सोय केली़