शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवसात ३८ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकाच दिवसात ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील सर्वाधिक अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाच दिवसात ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील सर्वाधिक अर्थात २९ जण नंदुरबार शहरासह तालुक्यातील आहेत तर उर्वरित जिल्हा रुग्णालय, तळोदा व शहादा येथील आहेत. आजच्या पॉझिटिव्ह संख्यमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. यापूर्वी ६ जणांचा मृत्यू झाला असून ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी तब्बल ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: नंदुरबार शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे.धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नंदुरबार शहरात २९, शहादा २, तळोदा २ तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दर्शवण्यात आले आहे़ आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे़शहादा शहरात गणेश नगर भागातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे़ तळोदा येथील मिरा कॉलनीत दोघे कोरोना बाधित आहेत़ दोघेही खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेल्याचे समजते़ जिल्हा रुग्णालयात पाच कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ यात चार कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी असून एक कर्मचारी जमाना ता़ अक्कलकुवा येथून डेप्युटेशनवर आलेला होता़ त्यालाही लागण झाल्याची माहिती आहे़ मंगळबाजार परिसरात, गिरीविहार, सैताणे, शहादा येथील बाधित हे आधीपासून क्वारंटाईन आहेत़ तर तळोदा दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़एकाच दिवशी प्राप्त झालेल्या या अहवालांमुळे एकच खळबळ उडाली आहे़ येथील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत रुग्णवाहिकेच्या चालकाचे २ नातेवाईक कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून या भागातील तिन बाधित रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहाद्यात पुन्हा दोनगणेशनगर भागातील १०८ रुग्णवाहिका वरील चालक कोरोना विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील ८ व्यक्तींना विलगीकृत करण्यासह त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.आज यासर्व आठ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून बाधित रुग्णवाहिका चालकाच्या दोन नातेवाईकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सहा नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.बाधित रुग्णवाहिका चालक हा गेल्या आठवड्यात एका डॉक्टर सोबत नाशिक येथे गेला होता तेथून परतल्यानंतर त्याला कोरोनाविषाणू सदृश्य लक्षणे आढळून आल्याने प्रशासनाने त्यास लागलीच विलगीकरण कक्षात दाखल केले होते.तीन दिवसानंतर सदर चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने संपूर्ण गणेशनगर भागातील परिसराला कंटेनमेंट म्हणून घोषित केले असून यामधील अनेक वसाहती सील केले आहेत.नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी ८ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली.

नंदुरबार शहरात आढळून आलेल्या २९ रुग्णांपैकी १० जण मंगळ बाजार परिसर, ८ जण गिरीविहार कॉलनी, २ ज्ञानदीप सोसायटी, २ कोकणी हिल तर नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़ सुरत येथील एक जण सैताणे आणि नंदुरबार शहरात येऊन गेला होता़ त्याच्या संपर्कात आलेल्या ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़ यातील दोघे ज्ञानदीप सोसायटी नंदुरबार तर सात जण हे सैताणे गावातील आहेत़

द्वारदर्शन पडले अनेकांना महागातमंगळबाजारातील सिद्धीविनायक चौकातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेच्या संपर्कातील १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय येथीलच कनेक्शन जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात देखील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषदेतही चलबिचलता निर्माण झाली होती. एवढ्या संख्येने रुग्ण आढळल्याने मंगळ बाजार आणि सिद्धी विनायक चौक भागात विशेष दक्षता घेतली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.