शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील मशरूमपासून तयार नानकटाईचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले काैतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

अक्कलकुवा शहरालगत गुजरात हद्दीतील गंगथा येथील रहिवासी व सातपुड्यातील मशरूम शेतीचे प्रणेते राजेंद्र वसावे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची ...

अक्कलकुवा शहरालगत गुजरात हद्दीतील गंगथा येथील रहिवासी व सातपुड्यातील मशरूम शेतीचे प्रणेते राजेंद्र वसावे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन, मशरूम शेतीपासून तयार केलेले मशरूम पावडर, मशरूम पापड, नानखटाई भेट दिली. यावेळी डॉ. भारुड यांनी नानकटाईची चव चाखून जिल्ह्यात मशरूम शेतीच्या माध्यमातून सातपुड्यातील युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेंद्र वसावे यांचे कौतुक केले. मशरूमपासून निर्मित केलेल्या उत्पादनांना योग्य पद्धतीने सादर केल्यास त्यांची मागणी वाढेल, असा विश्वास डाॅ. भारुड यांनी यादरम्यान व्यक्त केला.

प्रसंगी चित्रकार दारासिंग वळवी, भारतीय किसान सेनेचे महासचिव पंडित तडवी, कांतीलाल जाधव,लीलाबाई वसावे उपस्थित होते.

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. दरम्यान २०१५-१६ साली सुरत येथे मशरूम शेतीच्या एका कार्यशाळेत सहभागी झालो याठिकाणी मशरूम शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळाल्याने या व्यवसायाकडे वळून आदिवासी युवकांनाीही त्यात समाविष्ट करुन घेत आहे.

मशरूम शेती कायमस्वरुपी घरच्या घरी करता येते. फक्त उन्हाळयात दोन ते तीन महीने तापमान नियमित करावे लागते. मशरूम तयार करण्यासाठी नैसर्गिक किंवा रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेला भात, गहु ,मकाई,ज्वारी,लाकडाचा भुसा वापरावा लागतो. तो भुसा बेड मध्ये निर्जंतुकीकरण करून चार ते पाच तास निचरा करण्यासाठी ठेवावा लागतो.बॅग पॅक करताना मशरूम चे बियाणे बेड भरताना आपल्या हातात ग्लोज घातलेले पाहिजे. ज्यांच्याकडे जमिनी आहे, पण पाण्याची सुविधा नाही किंवा भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी मशरूम शेती चांगला रोजगार देणारी आहे. कारण शरीरासाठी पौष्टिक असलेल्या मशरूमची प्रति किलो हजार ते बाराशे रुपये दराने विक्री होऊ शकते, अशी माहिती राजेंद्र वसावे यांनी दिली.