शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर येथे मुस्लीम समुदायाचा लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

महिनाभराचे रोजे असल्याने मुस्लीम समाजाने लसीकरण फारसे केले नाही, उपाशीपोटी कोरोना लसीकरण घेऊ नये, असा वैद्यकीय सल्ला असल्यामुळे मुस्लीम ...

महिनाभराचे रोजे असल्याने मुस्लीम समाजाने लसीकरण फारसे केले नाही, उपाशीपोटी कोरोना लसीकरण घेऊ नये, असा वैद्यकीय सल्ला असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी रमजान महिना संपल्यानंतर कोरोना लसीकरण घेण्यासाठी पुढे येत आहे. यासाठी नवापूर तहसील कार्यालयात तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी मुस्लीम बांधवांची बैठक घेऊन लसीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार नवापूर सुन्नी मुस्लीम ट्रस्टीकडून लसीकरण संदर्भात आव्हान करण्यात आले आहे. यांतर्गत रविवारी सकाळी नवापूर शहरातील मदरसा हॉलमध्ये सुन्नी मुस्लीम ट्रस्ट सचिव गुलाम भाई व्होरा यांनी सुरुवातीला लसीकरण केले. त्यानंतर इतरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

यावेळी सुन्नी मुस्लीम ट्रस्ट सचिव गुलाम भाई व्होरा, तहसीलदार मंदार कुलकर्णी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, पालिका बांधकाम सभापती आरिफभाई बलेसरिया,भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, अखिल भारतीय अल्पसंख्याक युवा संघटनेचे प्रमुख रऊफ शेख, नगरसेवक आयुब बलेसरिया, जकीर पठाण, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक तीनमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक खलील खाटीक, नगरसेविका मीनल लोहार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मदरसा हॉल येथे ४० हिंदू-मुस्लीम बांधवांनी लसीकरण करून घेतले. रमजान नंतर मुस्लीम बांधव लसीकरण घेण्यासाठी केंद्रांवर दिसून येत आहे. कोरोनाची कुठलीही लाट आल्यास लसीकरण एकमेव आपल्याला कोरोना आजारापासून वाचवू शकतो, असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे यांनी व्यक्‍त केले.