भुजगाव येथे मशरूम शेतीविषयक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST2021-02-20T05:31:56+5:302021-02-20T05:31:56+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ कृषी अधिकारी पी.बी. पाडवी यांनी युवकांनी आता शेतीला कृषिपूरक व्यवसायांची जोड देण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान ...

Mushroom Farming Workshop at Bhujgaon | भुजगाव येथे मशरूम शेतीविषयक कार्यशाळा

भुजगाव येथे मशरूम शेतीविषयक कार्यशाळा

कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ कृषी अधिकारी पी.बी. पाडवी यांनी युवकांनी आता शेतीला कृषिपूरक व्यवसायांची जोड देण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी प्रास्ताविकात मशरूमचे आहारातील महत्त्व व हवामान बदलाचा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे यांनी मशरूम उत्पादनाच्या पद्धती, निर्जंतुकीकरण, बेड भरण्याची पद्धत, मशरूमचे अर्थशास्त्र, मशरूमचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात राजेंद्र वसावे यांनी मशरूमसाठी बेड भरण्याचे प्रात्यक्षिक दाखविले व मशरूम उत्पादनात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. जेलसिंग वळवी यांनी विक्री व्यवस्थेबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन निकरा प्रकल्पाचे अरुण कदम यांनी तर आभार भाईदास पावरा यांनी मानले. कार्यक्रमास भुजगाव, शिवनीपाडा, उमराणी, रोषमाळ येथील शेतकरी व युवक उपस्थित होते.

Web Title: Mushroom Farming Workshop at Bhujgaon