मागील पैश्यांच्या देवाण घेवाणीतून पिंप्री येथे खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:22 IST2020-07-16T12:22:23+5:302020-07-16T12:22:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील पिंप्री येथे पैश्यांच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली़ ...

Murder at Pimpri from previous money laundering | मागील पैश्यांच्या देवाण घेवाणीतून पिंप्री येथे खून

मागील पैश्यांच्या देवाण घेवाणीतून पिंप्री येथे खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील पिंप्री येथे पैश्यांच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली़ याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला़
चंद्रसिंग दामू मोरे (४५) रा़ पिंप्री असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ १० जुलै रोजी चंद्रसिंग मोरे पिंप्री शिवारात रमण सोमजी पटेल यांच्या शेतात मयतावस्थेत आढळून आले होते़ कोणत्यातरी हत्याराने त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते़ याबाबत शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ दरम्यान पोलीस तपासात वनसिंग ऊर्फ काल्या बुग्या पवार, ओंकार नारायण सोनवणे दोघे रा़ पिंप्री यांनी पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून खून केल्याचे स्पष्ट झाले होते़ त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी रात्री वनसिंग पवार यास अटक केली़ याबाबत विष्णू चंद्रसिंग मोरे यांच्या फिर्यादीवरुन वनसिंग व ओंकार या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत़

Web Title: Murder at Pimpri from previous money laundering