शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलाव लोकार्पणासाठी सेनाप्रमुखांना पालिकेचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावणेतीन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावणेतीन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निमंत्रण देखील पालिकेकडून पाठविण्यात आले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी  दिली.याबाबत माहिती देतांना आमदार रघुवंशी यांनी सांगितले, पालिकेने ऑलिम्पिीक खेळाच्या धर्तीवर जलतरण तलाव बांधला आहे. त्याचे काम पुर्णत्वास आले आहे. 15 ऑगस्टर्पयत काम पुर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. साधारणत: 15 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. जलतरण तलावाला सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याच परिवाराच्या हस्ते त्याचे उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा शहरवासीयांची व नगरपालिकेची आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे. दोघांनाही अधिकृत आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आमदार रघुवंशी यांनी दिली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जलतरण तलावाच्या दोन्ही बाजुला व प्रवेशाच्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गोठे तयार केले आहे. गोठय़ातील शेण व इतर घाण रस्त्यावरच टाकली जात आहे. त्यामुळे या चांगल्या वास्तूच्या सौंदर्याला डाग लागत आहे. शिवाय या रस्त्याने वापरणा:या नागरिकांना देखील मोठय़ा गैरसोयीला सामोरे  जावे लागत आहे. ही बाब लक्षात  घेता येथील गोठे हटविण्यासाठी प्रसंगी कठोर पाऊल उचलावे लागेल असेही आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले.