शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर ओढवली महावितरणनिर्मित ‘आपत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल ...

शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळी हंगामात कोरोनामुळे पिके शेतातच पडून खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गेल्या हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर केळी, पपईची रोप लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. केळी, पपई पिकांची कशीबशी लागवड केली. मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशीबशी पिके जगविण्याचा आटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिकांचे स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महावितरणच्या लहरी वीजपुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. वीजपुरवठा दिवसाचा असला तरी वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी देणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. शहादा तालुक्यातील भागापूर परिसराला वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आधीच सलग दोन हंगाम अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा जास्त अंत न पाहता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

फॉल्ट काही सापडेना

भागापूर शिवारात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून संबंधित लाईनमन यांना वीजपुरवठा वारंवार खंडित का होत आहे याचा फॉल्ट काही सापडेना अशी गत झाली आहे. यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या केळी, पपईच्या रोपांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

शेतात केळी, पपई पिकाची लागवड केली आहे. सध्या गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत असून पाण्याअभावी रोप करपू लागले आहे. वीज वितरण कंपनीने एकदाचा फॉल्ट शोधून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.

-जगदीश पाटील, शेतकरी, भागापूर, ता.शहादा