बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST2020-03-05T11:59:49+5:302020-03-05T11:59:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे ...

Movement if the dam wall is not built | बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे या बंधाºयातून निघालेल्या पाटचाऱ्यांना यंदा पाणीच आले नाही. परिणामी टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड येथील शेतकºयांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ही भिंत पावसाळ्यापुर्वी बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोमाई नदीला वेळोवेळी पूर आला होता. या पुरामुळे कवळीथ येथील ब्रिटीशकालीन बंधाºयाची पाटचारींची भिंत पडली होती. परिणामी या बंधाºयातून निघणाºया पाटचाºयांचे पाणी बंद झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस होऊनही यंदा पाटचाºयांना पाणीच आले नसल्यामुळे टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड गाव व परिसरातील शेतकºयांना रब्बी व आता उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.
दरवर्षी कवळीथ बंधाºयातून लहान व मोठ्या पाटचारीला वेळोवेळी पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाटचारीच्या लगत असलेल्या शेतकºयांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी मोठा दिलासा मिळत असतो. यंदा मात्र पाटचाºयांना पाणीच आले नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम झाला.
पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेवून पडलेली भिंत तातडीने बांधणे आवश्यक आहे. येत्या चार महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्याआधी भिंत बांधली गेल्यास यंदा पाणी अडवून पाटचाºयांना पाणी सोडता येणार आहे. परंतु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.
दरम्यान, भिंत बांधण्याबाबत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

कवळीथ बंधाºयातून निघणाºया पाटचारीमुळे सहा गावातील शेतकºयांना त्याचा लाभ होतो. यंदा मात्र पाटचारी कोरडीच राहिली. बंधारा व पाटचारीची भिंत तातडीने बांधावी व त्यातून पाणी सोडले जाईल याबाबत नियोजन करून शेतकºयांना दिलासा द्यावा.
-जयप्रकाश पाटील,
संचालक,सातपुडा साखर कारखाना.

Web Title: Movement if the dam wall is not built