मोटरसायकल अपघात; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:50+5:302021-04-04T04:31:50+5:30

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील किरणा दुकानाच्या सार्वजनिक जागेवर अशोक रामजी पाडवी हा जिल्हाधिकारी ...

Motorcycle accidents; Two injured | मोटरसायकल अपघात; दोन जखमी

मोटरसायकल अपघात; दोन जखमी

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील किरणा दुकानाच्या सार्वजनिक जागेवर अशोक रामजी पाडवी हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आला. म्हणून पोलीस शिपाई देवानंद कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

शहादा व म्हसावद येथे कारवाई

नंदुरबार : शहादा ते खेतिया रोडवर दरा फाटाजवळ मधुकर रामदास पाटील रा. मातोश्री नर्मदानगर, लोणखेडा तर खेतिया शहादा रोडवर बाबा हाॅटेल समोरच्या सार्वजनिक जागेवर मेरवान होनाऱ्या नाईक रा.तोरणमाळ हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क किंवा रुमाल न लावता वर्दळीच्या ठिकाणी फिरताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

गतिरोधकची मागणी

नंदुरबार : शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील साक्री रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे.

Web Title: Motorcycle accidents; Two injured