शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावदला मोकाट गुरांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद गावात मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला असून गावालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : म्हसावद गावात मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला असून गावालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र पशूपालक बिनधास्त होऊन बघ्याची भूमिका घेत आहेत. याबाबत ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तीक कार्यवाही करून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी म्हसावद ग्रामस्थांनी केली आहे. मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.याबाबत वृत्त असे की, म्हसावद गावासह गावालगत मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री-बेरात्री मोकाट गुरांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. गावालगत असलेल्या शेतातील गहू, हरभरा, केळी व इतर पिकांचे नुकसान करीत आहेत. मोकाट गुरांच्या झुंडीच्या झुंडी असल्याने पीक खाण्यापेक्षा पायदळी पिकांचे जास्त नुकसान होत आहे. त्यांना पकडताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. गावातही मोकाट गुरे फिरत असल्याने मारण्याच्या भीतीने ग्रामस्थ धास्तावले आहेत. पशूपालक मात्र बिनधास्त झाले आहेत. काहीच होत नाही या आविर्भावात लांबूनच बघ्याची भूमिका बजावत आहेत. याबाबत ग्रामस्थ, शेतकरी यांच्या सहकार्याने म्हसावद ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.