शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

माॅर्निंग वाॅक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकजण घरीच असल्याने अनेक बाबी करून पाहात आहेत. यात माॅर्निंग वाॅकचाही समावेश ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकजण घरीच असल्याने अनेक बाबी करून पाहात आहेत. यात माॅर्निंग वाॅकचाही समावेश आहे. परिणामी गेल्या महिनाभरात वाॅक करणारे अचानक वाढल्याचे चित्र असून, यातही सोशल डिस्टन्सिंग हरवल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले, तर काही ठिकाणी माॅर्निंग वाॅक दरम्यानही सुरक्षा उपाय करत असल्याचे दिसून आले.

नंदुरबार शहरात नगरपालिकेेने रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. याचा लाभ घेत सकाळी आणि सायंकाळी अनेकजण वाॅक करतात. या वाॅकिंगसोबतच मोकळ्या मैदानांवर व्यायाम, क्रिकेटसह इतर खेळही रंगतात. सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहेे. परिणामी नागरिक घरीच असून, यातून आलेला स्थूलपणा, नैराश्य तसेच आरोग्याची काळजी म्हणून सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम अर्थात वाॅक केला जात आहे. शासनाकडून लाॅकडाऊन असल्याने अनेक बाबींना बंदी असली तरी नागरिक आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत असल्याने त्यास एक प्रकारे सूटच असल्याचे दिसून आले आहे. परंतु सकाळच्या माेकळ्या हवेत गटागटाने फिरणे योग्य आहे का, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांकडूनही सूट

गेल्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर माॅर्निंग वाॅक करणाऱ्या महिला आणि पुरुषांना पोलीस पथकाकडून ताब्यात घेत त्यांच्यावर शहरातील त्या - त्या पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल करून न्यायालयातही हजर करण्यात आले होते.

सुमारे ६५० जणांवर ही कारवाई करून दंडही वसूल करण्यात आला होता. यानंतर मात्र वेळोवेळी झालेल्या लाॅकडाऊनमध्ये नागरिकही सावधगिरीने कोरोना उपाययोजना करून घराबाहेर पडत होते.

कोरोना काळात आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे असल्याने पोलीस व प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. यातून सकाळी गर्दी वाढली आहे.

दरम्यान, दिवसभर घरात असलेले ज्येष्ठ नागरिक चांगल्या आरोग्यासाठी सकाळी घराबाहेर पडतात. यातून व्यायाम होतो. दरम्यान, कोरोना विषाणू हवेतून पसरण्याची भीतीही असल्याने मास्कचा नियमित वापर करत असल्याची माहिती ज्येष्ठांकडून देण्यात आली.