शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उत्तरपत्रिका नेण्यास मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका गुरूवारी नाशिक विभागीय मंडळाने शहादा व नंदुरबार केंद्रावर अखेर जमा केल्यात. जिल्ह्यातील १२३ नियमकांनी या उत्तर पत्रिका बोर्डाकडे स्वाधीन केल्या. तब्बल दोन महिन्यांपर्यंत उत्तर पत्रिकांचा गाठोड्यांची डोळ्यात तेल टाकून काळजी घेत मनावरील प्रचंड दडपण दूर झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे सांगितले.
कोरोना या महामारीचा राज्यात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. साहजिकच संचारबंदीमुळे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षांबरोबरच नाशिक विभागीय मंडळांनी नियमकांकडे तपासणी करीता पाठविलेल्या उत्तर पत्रिकांवर झाला होता. इतिसाहाचा पेपर वगळता सर्वच विषयांचे पेपर परिक्षकांकडून तपासणी केल्यानंतर पुनर्तपासणीसाठी नियमकांकडे आले होते. नाशिक बोर्डाने पुनर्तपासणी करून २८ मार्च ते १० एप्रिलपर्यंत बोर्डात जमा करण्याचे वेळापत्रक नियमकांना दिले होते. त्यामुळे नियमकांनीदेखील युद्ध पातळीवर पुनर्तपासणीचे काम करून पेपरचे गाठोडे सुसज्ज केले. मात्र शासनाने लॉकडाऊनच्या मर्यादेत सातत्याने वाढ केली. साहजिकच वाहतुकीअभावी पेपर जमा करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परिणामी गेल्या दीड दोन महिन्यापासून नियमकांकडे पेपरचे हे गाठोडे तसेच पडून राहिले होते. शेवटी दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकालाला लागणारा वाढता विलंब लक्षात घेऊन नाशिक विभागीय मंडळाने पोलीस विभागाकडे वाहतुकीची विशेष परवानगी मागितली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारपासून तपासलेल्या उत्तर पत्रिका केंद्रानिहाय जमा करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा ही केंद्रे निश्चित करण्यात आली होती.
शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी शहादा तर नंदुरबार, नवापूरसाठी नंदुरबार केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील नियामक शिक्षकांनी या दोन केंद्रांवर मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासणी यांच्या उपस्थितीत जमा करून उत्तर पत्रिकांच्या गोण्या वाहनाने मंडळात रवाना केल्या. जिल्ह्यातून १२३ नियमकांनी उत्तरपत्रिका जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमिवर नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिका केंद्रस्तरीय संकलन पद्धतीचा अवलंब केला असला तरी पुढील वर्षीही अशाच पद्धतीने संकलन करावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. कारण तपासलेल्या उत्तर पत्रिका मंडळात शिक्षकांनाच न्याये लागतात. यात शिक्षकांचा नाहक वेळ खर्च होतो. शिवाय प्रवास भाडे, डी.ए.मुळे बोर्डालाही अधिक पैसा खर्च करावा लागतो. एकाच वाहनातून जिल्ह्यातील संपूर्ण उत्तर पत्रिका नेण्यात आल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. याबाबत शिक्षकांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.