मोलगी ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:24 IST2020-03-04T12:24:07+5:302020-03-04T12:24:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गु्रपग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई होणार ...

Molgi Gram Panchayat Investigation of Misconduct | मोलगी ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी

मोलगी ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गु्रपग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर मोलगी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर सुरु केलेले उपोषण मागे घेतले़ मंगळवारी मोलगी ग्रामस्थांनी हे उपोषण सुरु केले होते़
उपोषणकर्त्यांसोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती रतन पाडवी व जिल्हा परिषद सदस्य सीक़े़पाडवी यांनी चर्चा केली़ त्यानुसार मोलगी, उखल्लीपाडा, सोराचापाडा, बिजरीपाटी, निंबीपाडा या मोलगी ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत पेसानिधी, ग्रामनिधी तसेच विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोलगी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले होते़ मंगळवारी झालेल्या या आंदोलनाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्यास सांगितले़ बुधवारी गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल समोर येऊन १३ मार्चपर्यंत कामकाज होणार आहे़ त्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले होते़ दरम्यान ग्रामविकास अधिकारी बागले यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले गेले आहेत़

Web Title: Molgi Gram Panchayat Investigation of Misconduct